शिरूर (प्रतिनिधी )- शिरूर तालुज्यातील मलठण येथे घरगुती वापराच्या गॅस टाक्या मधून व्यवसायिक गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरून बाजारामध्ये चढत्...
शिरूर (प्रतिनिधी )- शिरूर तालुज्यातील मलठण येथे घरगुती वापराच्या गॅस टाक्या मधून व्यवसायिक गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरून बाजारामध्ये चढत्या दराने करत असल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना बातमीदारा मार्फत मिळाली.
याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक राऊत यांनी सपोनि अमोल पन्हाळकर यांना सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले.
याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की, मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने दि २३/०५/२०२२ रोजी पहाटे ०४.०० वा. मलटण गावचे हददीत शेतामध्ये छापा टाकला. यावेळी निळया कपडयाच्या आडोसा करून घरगुती गॅस सिलेंडर टाक्या मधुन कमर्शियल व्यावसायीक गॅसच्या टाक्यामध्ये पिनच्या कनेक्टरच्या साहयाने बेकायदेशीर पने भरत असल्याचे आढळून आले.
यावेळी आरोपी 1) अमोल निवृत्ती फुलसुंदर वय ३९ वर्षे दोन्ही रा. मलठण ता. शिरूर जि. पुणे २) मलप्पा आमोशीद नरवटे वय ३४ वर्षे ३) बसवराज लक्ष्मण नानाजे वय ३० वर्षे ४) सिध्दाराम विठठल बिराजदार वय ३१ वर्षे सर्व रा. पारीजात बंगल्या मागे मांगडेवाडी कात्रज, पुणे हे घरगुती गॅस सिलेंडर टाक्या मधुन कमर्शियल व्यावसायीक गॅसच्या टाक्यामध्ये पिनच्या कनेक्टरच्या साहयाने मानवी जिवीतास धोका होईल अश्या रितीने बेकायदेशीर पने भरीत असताना मिळुन आले.त्यांचे ताब्यात असलेल्या भारत गॅस कंपनीच्या एकुण ८० टाक्या, एचपी गॅसच्या एकुण १०० टाक्या, कमर्शियल व्यावसाहीक ९३ टाक्या व छोटया ३ टाक्या तसेच गॅस टाक्या भरण्या करीता वापरण्याच्या एकुण ४० पीन, एक इलेक्ट्रीक वजन काटा, गरम पाणी करण्याकरीता वापरच्या दोन लोंखडी टाक्या, दोन भटटी / शेगडी, एक लायटर गॅस टाक्या वाहतुक करण्यासाठी वापरण्याच्या महींद्रा पिकअप नं. एमएच १४ एझेड ५२८१ व महींद्रा जेनीयु नं. एमएच १४ सीपी १३१५ असे एकुण -११,०४,६५०/- रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.
वरील आरोपीत क्र. १ ते ४ यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे. सदरबाबत मा. तालुका दंडाधिकारी सो, शिरूर यांना पत्र देण्यात आलेले आहे.
याबाबत नजिम उरमान पठाण सहा फौजदार यांनी दिले फिर्यादी वरून आरोपीत यांचे विरूध्द शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. ३६४ / २०२२ भा.द.वि. कलम २८५,२८६, ३४ जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलीद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मागदर्शना खाली शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सपोनि अमोल पन्हाळकर, सहा. फौजदार नजिम पठाण, पोना / ११९१ अनिल आगलावे, पोकॉ/१३७८ राजेंद्र गोपाळे, पोअ / २०२७ विशाल पालवे पथकाने केली आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.
COMMENTS