शिरूर (प्रतिनिधी)- शिरूर ग्रामिण या ग्रामपंचायत च्या सरपंचपदी माजी सरपंच विठ्ठल घावटे यांच्या पत्नी, स्वाती घावटे यांची नियुक्ती झाली. य...
शिरूर (प्रतिनिधी)-
शिरूर ग्रामिण या ग्रामपंचायत च्या सरपंचपदी माजी सरपंच विठ्ठल घावटे यांच्या पत्नी, स्वाती घावटे यांची नियुक्ती झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरूरचे मंडलाधिकारी नलावडे यांनी काम पाहिले.
सरपंच निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात, अनेक मान्यवरांनी
आपली मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ऍड अशोक पवार यांनी नवनिर्वाचित सरपंच स्वाती घावटे यांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले कि सत्ता फार काळ नसते तुम्हाला जेवढा कार्यकाळ मिळतो त्या कार्यकाळात आपण आपल्या कार्याचा ठसा उमठवला पाहिजे.तसेच पुढे म्हणाले कि तुम्ही कागद पत्राची पूर्तता करा ग्रामपंचायत बांधण्यासाठी 50लाख निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी आदर्श सरपंच अरुणराव घावटे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवभाऊ घावटे, माजी आदर्श सरपंच नामदेवराव जाधव, माजी सरपंच नितीनशेठ बोऱ्हाडे, भाजपचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, भाजप उद्योग आघाडी चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, भाजप चे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे, तरडोबावाडी च्या माजी आदर्श सरपंच वर्षा काळे, माजी पंचायत समिती सदस्य दादापाटील घावटे, शामकांत वर्पे,आजी माजी सर्व सरपंच, उपसरपंच, विविध पक्षाचे व विविध संघटनांचे पदाधिकारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, उपस्थित होती.
COMMENTS