शिरूर (प्रतिनिधी ) -शिरूर बस्थानक येथे बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल दि 18/10/ 21 रोजी सायंकाळी 7:30 वा हिसकावून घेण्यात आला होत...
शिरूर (प्रतिनिधी )-शिरूर बस्थानक येथे बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल दि 18/10/ 21 रोजी सायंकाळी 7:30 वा हिसकावून घेण्यात आला होता सदरील प्रकरणात शिरूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने तीन आरोपीनां ताब्यात घेतले.
या बाबत अधिक माहिती अशी कि,दि 18/10/ 21 रोजी सायंकाळी 7:30 वा.चे सुमारास फिर्यादी ह्या शिरूर येथील एसटी स्टँड मधील एसटी बस मध्ये पाठी मागील सीटवर खिडकीजवळ बसले असताना एका आरोपी याने फिर्यादी यांचे हातातील रियलमी 8 कंपनीचा मोबाईल असा किंमत रु 18,000/- रुपये किमतीचा माल खिडकीतून आत मध्ये हात घालून हिसकावून ओढून जबरीने घेऊन नेले वरून बाबत शिरुर पो.स्टे गु.र.नं 806/21भादवि 392 अन्वये गुन्हा दाखल आहे.
राज्य महामार्गावर होणा-या जबरी चोरी व गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटक करणेकामी मा. डॉ. अभिनव देशमुख सो,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता.
याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पो.नि. श्री.अशोक शेळके स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा पुणे ग्रा. यांचे आदेशानेस्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक तपासावरून व गुप्त बातमीदाराकडून सदरच्या गुन्ह्यातील मोबाईल हा संशयित ईसम नामे यशवंत नवनाथ गाडे रा- शिरूर ता-जामखेड जि- अहमदनगर हा वापरत असले बाबत गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करता, त्यांने सदर च्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला रियलमी 8 कंपनीचा मोबाईल फोन वापरत असल्याचे सांगितलेणे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे रियल मी 8 कंपनीचा मोबाईल मिळून आला . सदर मोबाईल त्याने जामखेड येथील बॉम्बे मोबाईल शॉपी येथून विकत घेतल्याचे सांगितले तसेच त्याने मोबाईल खरेदी चे बिल ही दाखविली. सदरचा मोबाईल हा चोरीचा असल्याचे त्याला माहिती नसल्याने सदर मोबाईल त्याने बिल घेऊन खरेदी केला असल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि सचिन काळे हे त्यांचे तपास पथकासह जामखेड येथे जाऊन तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सदर बॉम्बे मोबाईल शॉपी मालक शहबाज मोहम्मद हनीफ सय्यद वय 26 वर्ष रा-जामखेड ता- जामखेड जि-अहमदनगर यास चौकशीकामी सोबत घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल त्याने इसम नामे विकास उर्फ बाळ्या लगस रा- जामखेड ता-जामखेड जि-अहमदनगर मूळ बिल व बॉक्स नसताना चोरीचा असल्याचे माहीत असताना खरेदी केला व त्यानंतर दिनांक 13/03/2022 रोजी त्याने तो मोबाईल इसम नामे यशवंत नवनाथ गाडे यास बॉम्बे मोबाईल शॉपी चे नावाचे बिल बनवून देऊन विक्री केला असल्याचे सांगितले आहे.
सदर आरोपी 1) शहबाज मोहम्मद हनीफ सय्यद वय 26 वर्ष रा-जामखेड ता- जामखेड जि-अहमदनगर. 2)विकास उर्फ बाळू प्रल्हाद लगस वय-27 वर्ष रा- जामखेड ता-जामखेड जि-अहमदनगर यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी गुन्ह्यातील चोरीस गेलेला रियलमी 8 कंपनीचा मोबाईल एकूण 18000/ रु.कि चा मुद्देमालसह शिरूर पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी,मा.डॉ. अभिनव देशमुख,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.,मा. मिलिंद मोहीते,अपर पोलीस अधीक्षक, बारामती ,मा. राहुल धस,उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड यांचे मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे,सहा.फौज पठाण सहा.फौज तुषार पंदारे,पो हवा पासलकर,पो. हवा जनार्दन शेळके, पो.हवा राजू मोमीन,पोना मंगेश थिगळे,पो.ना योगेश नागरगोजे पो.कॉ. खडके यांनी केली आहे
COMMENTS