शिक्रापूर (प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांनी केलेल्या कार्याची अनेक स्तरावर नोंद घेण्यात आलेली असताना महाराष्...
शिक्रापूर (प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांनी केलेल्या कार्याची अनेक स्तरावर नोंद घेण्यात आलेली असताना महाराष्ट्रातून पहिल्यांदा साप पकडण्यासाठी चांदीची स्टिक बनवून त्यांनी विक्रम नोंदवला असताना आता नुकतीच त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांनी शिरुर तालुक्यात शेकडो सापांना जीवदान देत अनेकदा कुत्रिम पद्धतीने सापाच्या अंड्यातून सापाच्या पिलांना जन्म दिला आहे, अलीकडील काळात त्यांनी साप पकडण्यासाठी चांदीची स्टिक बनवून महाराष्ट्रात विक्रम केला आहे, त्यांच्या चांदीच्या स्टिकची चर्चा सर्वत्र होत असताना नुकतेच त्यांच्या सर्पमित्र शेरखान शेख यांच्या नावाची दाखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे, त्यांना नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र, पुस्तक, सन्मान पदक प्राप्त झाले आहे, तर याबाबत बोलताना माझ्या कार्याची देशपातळीवर दखल घेतल्या गेल्याचा आनंद झाला असून माझे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोहोचवण्यासाठी माझा मित्र दत्ता कवाद याने विशेष परिश्रम घेतले असल्याचे शेरखान शेख यांनी सांगितले. तर शेरखान शेख यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्यांचे शिरुर तालुक्यातून कौतुक होत आहे.
COMMENTS