शिरूर (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यात बेकायदेशीर दस्तांच्या नोंदीचा धुमाकूळ! सामान्य जनता झाली व्याकुळ! शिरूर तालुक्यातील शिरूर शहर व तळेगाव ...
शिरूर (प्रतिनिधी)-
शिरूर तालुक्यात बेकायदेशीर दस्तांच्या नोंदीचा धुमाकूळ!
सामान्य जनता झाली व्याकुळ!
शिरूर तालुक्यातील शिरूर शहर व तळेगाव ढमढेरे येथील नोंदणी व मुद्रांक विभागात बेकायदेशीर होत असलेल्या नोंदी बाबत कारवाई करण्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित कक्षाचे मा. शहर अध्यक्ष रवि लेंडे उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील औद्योगिक करणामुळे येथील जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे.
त्यामुळे येथे मोठ्याप्रमाणत जमिनीची खरेदी-विक्री होत असते.
शिरूर तालुक्यात दोन ठिकाणी सबरजिस्टार चे कार्यालय आहे. एक शिरूर शहर व दुसरे तळेगाव-ढमढेरे या दोन्ही ठिकाणी मोठ्याप्रमाणात जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांची गर्दी असते.यात शासनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.
परंतु हे सर्व होत असताना या दोन्ही ठिकाणी बेकायदेशीर नोंदी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत व झाल्या आहेत. यामुळे यात शासनाची व सामान्य जनतेची फसवणूक होत आहे.
या मध्ये अधिकारी व एजंट सामील असून लाखो रुपये हे सामान्य जनतेकडून लूट करत आहेत.
शिरुर तालुक्यामध्ये शिरुर शहर व तळेगाव ढमढेरे या दोन गावी नोंदणी व मुद्रांक विभागाचे कार्यालय आहेत. सदर ठिकाणी नगररचना विभागाची बांधकाम परवानगी असताना व कोणतेही पुर्णत्वाचा दाखला न घेता दस्त नोंदविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे रे.रा. कार्यालयाचीही बांधकाम परवानगी घेतलेली आहे. परंतु कम्प्लीशन घेण्यात आलेले नाही. असे अनेक प्रकार या नोंदणी कार्यालयात घडत आहेत.
तसेच गट नंबर खोडून गावठान हद्द दाखवून विना परवानगी दस्त नोंदविण्यात आलेले आहे.
या मध्ये जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित मा. शहराध्यक्ष रवि लेंडे यांनी केली.
COMMENTS