शिरूर ( प्रतिनिधी ) - जागृत शोध ने दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी सदरील प्रकारा बाबत बातमी प्रकाशित केली होती.या बातमीची शिरूर पोलिसांनी दखल घ...
शिरूर ( प्रतिनिधी ) - जागृत शोध ने दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी सदरील प्रकारा बाबत बातमी प्रकाशित केली होती.या बातमीची शिरूर पोलिसांनी दखल घेत त्या फरगडेवर गुन्हा दाखल केला.
या बाबत सविस्तर असे कि शिरूर येथील भूमी अभिलेख शाखेत तक्रार याने दिनांक 03-02-2022 रोजी उपाधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरूर जिल्हा पुणे यांच्या कार्यालयाकडे माहिती अधिकारामध्ये जमीन मोजणी बाबत ची माहिती नागरिकांच्या तक्रारीवरून मागवली होती. या कार्यालयातील संबंधित माहिती अधिकारी यांनी मुदतीमध्ये तक्रारदार यांना माहिती न दिल्याने अपिलीय अधिकारी यांच्याकडे दिनांक 8-3-2022 रोजी अपील केले होते.
संबंधित अधिकाऱ्याने माहिती अधिकारात माहिती न देता माहिती मागवीनाऱ्यास विविध लोकांच्या माध्यमातून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. दिनांक 26-03-2022 तक्रारदार यांच्या ओळखीचे नवनाथ फरगडे याने तक्रारदारास फोन करून थोडे काम असल्याने माझ्या कार्यालयात येण्याची विनंती केली. यावरून तक्रार व त्यांचा साथीदार यांनी त्यांच्या कार्यालयात गेले असता, सदरील व्यक्तिच्या कार्यालयात गेल्यानंतर तक्रारदार यांना नवनाथ फरगडे यांच्या कार्यालयात भूमी अभिलेख विभागाचा उपाधिक्षक विनायक ठाकरे हे बसलेले होते.असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, तक्रारदार हे अवाक होऊन विनायक ठाकरे यांना प्रश्न केला की तुम्ही इथे कसे? त्यावेळी विनायक ठाकरे म्हणाले की, तुम्हाला माहित आहे आमचे मैत्रीचे संबंध आहेत एकमेकांना मदत करतो असे सांगितले. ठाकरे पुढे म्हणाले की माहिती अधिकारात प्रकारणांची माहिती काय मागता अगोदर भेटल्या असत्या तर इतरांप्रमाणे तुम्हालाही मालामाल केले असते. त्यावेळी तेथे बसलेले नवनाथ फरगडे याने विनायक ठाकरे यांना थांबवत म्हणाले की तुम्ही समजून घ्या आमच्या फार्महाऊसवर चला तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा आम्ही पूर्ण करण्यास तयार आहोत. यामुळे तक्रारदार यांनी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भुमी अभिलेख पुणे यांच्याकडे दि.13-04-2022 रोजी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून जागृत शोध वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत शिरूर पोलिसांनी शिरूर पोलीस ठाणे येथे संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता चरापले या करत आहेत.
COMMENTS