शिरूर (प्रतिनिधी)- उपअधिक्षक भूमि अभिलेख शिरूर यांच्यावर चुकीची नियमबाहय जागेची नोंदणी केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करून,घेण्यात आलेली न...
शिरूर (प्रतिनिधी)- उपअधिक्षक भूमि अभिलेख शिरूर यांच्यावर चुकीची नियमबाहय जागेची नोंदणी केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करून,घेण्यात आलेली नोंद तात्काळ रद्द करण्यात यावे असे निवेदन मनसेचे महीबुब सय्यद यांनी जमाबंदी आयुक्त एन.के.सुधांशु यांना दिले. यावेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित चे रवि लेंडे उपस्थित होते.
महिबूब सय्यद यांनी दिलेल्या माहितीनूसार पुणे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी Collector Poona (R.B.) No. LND.SR-VI. 122/67 Poona -1.Dt. 10/06/1967 हा आदेश काढला होता.परंतु शिरूर भूमिअभिलेख उपअधीक्षक यांनी फेरफार नोंदवही / उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय, शिरूर / फेरफार क्र.३२५४ दि.२७/११/2020 ला नोंद घातली.
तत्कालिन जिल्हाधिकारी पुणे यांनी सन १९६७ साली महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या संस्थेस ३४९८ स्क्वे.फुट. इतकी जागा प्रदान करण्यात आलेली आहे. Collector Poona (R.B.) No. LND.SR-VI. 122/67 Poona -1.Dt. 10/06/1967 परंतु फेरफार नोंदवही / उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय, शिरूर / फेरफार क्र.३२५४ परंतु उपअधिक्षक भूमि अभिलेख शिरूर यांनी या जागेचा फेर नोंद करताना जागेचे क्षेत्रफळ ३४९८ स्क्वे.फुट.इतकी नोंद न घालता १७७६ चौ.मी. इतकी घातली आहे. या झालेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून उपअधिक्षक भूमि अभिलेख शिरूर यांच्यावर चुकीची नोंद घातल्याबद्दल तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करून,घालण्यात आलेली चुकीची नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने या विरुध्द तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे सांगितले.
COMMENTS