भूमि अभिलेख विभागाचे संचालक तथा जमा बंदी आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार शिरूर (प्रतिनिधी ) शिरूर येथील भूमी अभिलेख शाखेत मोठया प्रमाणात अनाग...
भूमि अभिलेख विभागाचे संचालक तथा जमा बंदी आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार
शिरूर (प्रतिनिधी ) शिरूर येथील भूमी अभिलेख शाखेत मोठया प्रमाणात अनागोंदी कारभार सुरु आहेत. या कार्यालयातील गलथाण कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठया प्रमाणात मालिदा घेऊन चुकीच्या पद्धतीने मोजणी केल्यामुळे अनेक ठिकाणी दोन गटात संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
जमीन मोजणी प्रकरणात अनियमितता आढळून आल्याचे अनेक तक्रारीत म्हटले आहे.शिरूर येथील एका महिलेने माहिती अधिकारात माहिती मागतीली होती मात्र त्यांना माहिती न देता त्यांना फार्म हाऊसवर बोलावल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली.सदरील महिलेने भूमी अभिलेख विभागाचे संचालक तथा जमा बंदी आयुक्त पुणे यांच्याकडे बुधवार दिनांक 13-04-2022 रोजी तक्रार केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे कि, उप अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयात दिनांक 3-02-2022 रोजी माहिती अधिकार कायद्यान्वये कार्यालयीन माहिती मागविली होती. माहिती न मिळाल्याने आपिलीय अधिकारी विनायक ठाकरे उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अपील केले असता त्यांनी माहिती देण्याऐवजी त्यांचे मित्र नवनाथ फरगडे यांच्या मार्फत निरोप पाठविला व माहिती अधिकारात माहिती मागविणाऱ्या महिलेस नवनाथ फरगडे याने माहिती काय मागवता असा प्रश्न करून फार्म हाऊसवर बोलवीन्याचे व तुमचे सगळे विषय मार्गी लावण्याचे आमिष दाखविले. अशी तक्रार भूमी अभिलेख विभागाचे संचालक तथा जमा बंदी आयुक्त पुणे यांच्याकडे बुधवार दिनांक 13-04-2022 रोजी तक्रार केली आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे कि, शिरूर भूमी अभिलेख उप अधिक्षक विनायक ठाकरे यांची कृती एका महिलेच्या आत्मसन्मानास ठेच पोहचवीणारी आहे. तरी या घटनेची गंभीर दखल घेऊन शिरूर भूमी अभिलेख उप अधीक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन भूमी अभिलेख विभागाचे संचालक तथा जमा बंदी आयुक्त एन के सुधांशु यांनी तक्रारदार महिलेस दिले आहे.
COMMENTS