शिरुर ( प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यातील, शिरुर ग्रामीण(रामलिंग ,दसगुडे मळा) येथील जमीन आमच्या मालकीची होती व आहे , सदरील जमीनि संदर्भात लोंढे...
शिरुर ( प्रतिनिधी )
शिरुर तालुक्यातील, शिरुर ग्रामीण(रामलिंग ,दसगुडे मळा) येथील जमीन आमच्या मालकीची होती व आहे , सदरील जमीनि संदर्भात लोंढेनी सूडबुद्धीने तक्रार केली असल्याचे सचिन दसगुडे यांनी सांगितले.
सचिन दसगुडे म्हणाले कि,आमचे आजोबा धोंडिबा कोंडाजी दसगुडे यांनी 14/10/1992 ला या जमिनीचे साठेखत व 13/01/1993 ला खरेदीखत करून ,भिकाजी सखाराम लोंढे यांच्या कडून जमीन घेतली होती.माझे आजोबा आशिक्षित असल्याने सदरील जमिनीचे खरेदी खताची नोंद राहिली होती.त्यामुळे आमची 17/12 वर नोंद न लागल्या मुळे भिकाजी लोंढे यांनी याचा फायदा घेत, फसवणूकीच्या उद्देशाने त्यांच्या मुलांची वारस नोंद लावली व बँक चे कर्ज ही काढून आमची फसवणूक केली असल्याचे सांगितले.
धोंडिबा दसगुडे यांचे नातू सचिन दसगुडे यांनी जामिनीचे खरेदी खत देऊन सर्व पुरावा देऊन जमिनीचे सात बारा नोंद करून घेतली.मात्र भिकाजी लोंढे हे विनाकारण तक्रार अर्ज करून प्रशासनाची दिशाभूल करत आहेत. त्यांची तक्रार हि तत्यहीन असून त्यांनीच आमची फसवणूक केली असून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सचिन दसगुडे यांनी सांगितले आहे.
COMMENTS