शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर येथील भूमी अभिलेख शाखा हि भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सह...
शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर येथील भूमी अभिलेख शाखा हि भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.मोजणीचे पैसे भरूनही मोठया रकमेची मागणी अधिकारी दलालांच्या माध्यमातून करत असल्याचे चित्र आहे. उपाधीक्षक यांच्या कार्यलयात दलालांचा वावर मोठया प्रमाणात वाढला असून जो अधिक वजन ठेवेल त्याची मोजणी तात्काळ केली जात असल्याचा आरोप मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी केला. तशी पुराव्यास जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कडे तक्रार केली आहे.
उपअधिक्षका विरोधात अनेक तक्रारी वरिष्ठानंकडे गेल्या असूनही या अधिकाऱ्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही हे विशेष.वरिष्ठ अधिकारी या भ्रष्ट अधिकाऱ्यास का पाठीशी घालत आहेत असा सवाल प्रवाशी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी केला. या भ्रष्ट अधिकाऱ्यांसह त्यास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांचीही चौकशी करून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शिरुर तालुक्यातील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य जनतेचे कामे करण्याऐवजी फक्त धनदांडग्यांची कामे आर्थिक मालिदा घेवून करीत आहेत. सर्वसामान्य जनतेची मोजणी प्रकरणे वर्षानुषे प्रलंबित ठेवली जातात. टेबलाखालून देणाऱ्यांची मोजणी प्रकरणे, खाजगी मोजणी धारकांच्या सहाय्याने परस्पर मोजणी करुन निकाली काढली जातात. मात्र शेतकरी बांधवांची प्रकरणे वर्षानुवर्षे कार्यालयात धूळ खात पडलेली आहे.शेतकऱ्यांनी सुध्दा मोजणीची फी भरलेली आहे. मग धनदांडग्यांच्या मोजणी प्रकरणांना प्राधान्य का? शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची भाग पाडून त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
शिरूर भूमी अभिलेख शाखेतील या मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे अनेक कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत मात्र या कार्यालयातील सर्वात भ्रष्ट अधिकारी उप अधिक्षक मोकाट सुटतो कसा असा प्रश्न मनसे जनहित कक्षाचे रवी लेंडे यांनी उपस्थित केला
येथील कार्यालयातील कागदपत्रांचे गाठोडे चक्क स्वछता गृहात आढळून आल्याची चर्चा झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या चर्चे नंतर उप अधीक्षकांनी सदरील कागद पत्रांचे घाठोडे चक्क घरी नेले असल्याचे बोलले जात आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी माहिती मागविली असता त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नं देता संबंधित कार्यकर्त्यास दलाला करवी चक्क फार्म हाऊसवर बोलावले जाते.या घडलेल्या प्रकारची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती मात्र काय त्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसली नाही. हे उघड झाले आहे की वरिष्ठ अधिकारी या अधिकाऱ्यास पाठीशी घालत आहेत.
मनसे चे उप जिल्हाप्रमुख मेहबूब सय्यद, अनिल बांडे, रवी लेंडे यांनी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे मा.सुधांशु त्यांची समक्ष भेट देऊन पुराव्यानिशी तक्रार केली असून आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले आहे.
COMMENTS