शिरूर (प्रतिनिधी) नाभिक समाजाबाबत अपशब्द वापरून अपमान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त करुन त्यांनी नाभिक समाज...
शिरूर (प्रतिनिधी)
नाभिक समाजाबाबत अपशब्द वापरून अपमान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त करुन त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी शिरूर शहर व तालुका नाभिक संघटनेच्यावतीने करण्यात आली.तसे निवेदन शिरूरचे तहसिलदार रंजना उबरहांडे यांना देण्यात आले.अव्वल कारकून अनिल पाटील यांनी ते स्विकारले.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर,शिरूर तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणपत क्षिरसागर,सचिव दत्तात्रय शिंदे,शहराध्यक्ष सनी थोरात,सल्लागार गोरख गायकवाड,रणजीत गायकवाड,संतोष शिंदे,शहर उपाध्यक्ष संतोष गायकवाड,वैभव रायकर,सचिव राजेंद्र कडुसकर, कार्याध्यक्ष प्रितेश फुलडाळे, संतोष वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, शशिकांत गायकवाड उपस्थित होते.
आघाडी सरकारवर टिका करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा संदर्भ देत अपशब्द वापरुन अपमान केल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असुन त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे.
COMMENTS