शिरूर दिनांक 18-03-2022 (प्रतिनिधी)- शिरूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोवरील कंपोस्ट खताची नगर परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला स...
शिरूर दिनांक 18-03-2022 (प्रतिनिधी)-
शिरूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोवरील कंपोस्ट खताची नगर परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सूचना न देता परस्पर त्याची विल्हेवाट लावत असल्याची तक्रार शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
ही तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे,बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष फिरोज सय्यद,सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांनी केली.
यावेळी महिबूब सय्यद यांनी सांगितले की शिरूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापण डेपोवरील जमा होणाऱ्या कंपोस्ट खताची विल्हेवाट लावण्यासाठी दिनांक 15/03/2022रोजी सायंकाळी प्रेरणा उद्यानामध्ये खाजगी मालकीचे सहा हायवा जेसीबीच्या साहाय्याने पंधरा ते वीस फूट खोल खड्डा खोदून कंपोस्ट खत वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की आम्ही हे गाडीत भरून तीस किलोमीटरच्या अंतरात कुठेही टाकून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी याबाबत सय्यद यांनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मुख्याधिकारी म्हणाले मला या बाबत काहीही माहिती नाही, मी माहिती घेतो,मी याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले.ही बाब गंभीर असल्याचे सय्यद म्हणाले तसेच प्रेरणा उद्यानात अनाधिकृतरित्या प्रवेश करून वाहतूक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की स्वच्छता विभागाकडे तक्रारी अर्ज आलेला आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता विभागाकडून माहिती मागवून आलेल्या माहितीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
COMMENTS