25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ओबीसी,व्हिजेएनटी बहुजन परिषदेस मोठया संख्येने उपस्तित राहावे -ओबीसी नेते कल्याण दळे शिरूर दिनांक (प्रतिनिधी)- ...
25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ओबीसी,व्हिजेएनटी बहुजन परिषदेस मोठया संख्येने उपस्तित राहावे -ओबीसी नेते कल्याण दळे
शिरूर दिनांक (प्रतिनिधी)-
गावागाड्यामध्ये सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या बारा बलुतेदार, आलुतेदार,S.B.C., आदिवासी, S.C.(ओबीसी) समाजाच्या संविधानिक न्याय व हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजातील सक्रिय कार्यकर्त्यांचे एकच मजबूत संघटन व्हावे यासाठी राज्यस्तरीय ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषद या संघटनेची स्थापना महाराष्ट्र मधील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मध्ये ओबीसी समाजाची राज्यस्तरीय परिषद होणार आहे.या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बहुजन ओबीसी नेते कल्याणरावजी दळे यांनी केले.
त्या परिषदेमध्ये नव्या संघटनेची घोषणा होणार असुन . या ओबीसी बहुजन परिषदेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार असणार आहेत,या परिषदेला राज्यातील ओबीसी उपेक्षित असलेल्या समाजातील नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कल्याण दळे यांनी शिरूर येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
यावेळी कल्याण काळे म्हणाले की ओबीसींच्या संविधानिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवर पूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने आंदोलने झाली. महाराष्ट्रा मध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे व ओबीसी नेत्यांचे एक राजकारण विरहित सामाजिक संघटन असावे अशी मागणी होत होती. महाराष्ट्रामध्ये ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी या बहुसंख्य असणाऱ्या समूहाला आपले संविधानिक हक्क व अधिकार, शिक्षण, नोकरी आणि पंचायत राज मधील आरक्षण यासंदर्भात घटनात्मक हक्काविषयी जागृत करणे हे या महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
ही संघटना चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करणार असून फुले-शाहू-आंबेडकर - गाडगेबाबा यांच्या पुरोगामी विचारावर ओबीसींना एकत्र करून न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, पंचायत राज मधील 27 टक्के आरक्षण संदर्भात केंद्र शासनाला घटना दुरुस्ती करून सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,राजकीय आरक्षण मिळविणे हे उद्दिष्ट संघटनेचे असणार आहे.
ओबीसी हा समाज हा मोठ्या प्रमाणात विखुरलेला असून त्यांना एकत्रित करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गेली सत्तर वर्षापासून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची भूमिका घेऊन अनेक संघटना काम करत आहेत. ओबीसी युवकांना धार्मिक आणि जातीय विषारी भावनांमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे. ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कासाठी संघटित करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संघटनेची घोषणा राज्यस्तरीय ओबीसी बहुजन मेळाव्यात मा.ना. विजय वडेट्टीवार हे करणार आहेत. या राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन ओबीसी नेते कल्याण औताडे यांनी केले.
ओबीसी नेते दत्ताभाऊ चेचर, बारा बलुतेदार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर,प्रदेश अध्यक्ष युवा आघाडी बारा बलुतेदार महासंघ विशाल जाधव
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नाभिक महामंडळ भाऊसाहेब पंडित
पुणे जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळ रमेश राऊत
पुणे जिल्हाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ सोमनाथ शेळके, गोरख गायकवाड,रणजित गायकवाड,सनी थोरात,अमित शिर्के, निलेश भोसले,संतोष जमादार, विनोद (गुलाब )शिर्के, विष्णू जामदार, दत्ता काळे,बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष फिरोज सय्यद,ॲड स्वप्निल माळवे, शारदा भुजबळ, विकास अभंग, ह.भ.प.श्री. शांताराम महाराज बारवेकर शिरूर तालुका अध्यक्ष अखिल महाराष्ट्र सुतार - लोहार संघ,शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात, नगरसेवक विनोद भालेराव, शिरूर शहर नाभिक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाऊ क्षीरसागर, नाभिक महामंडळाचे शिरूर तालुकाध्यक्ष गणपत क्षीरसागर, संतोष गायकवाड, संतोष वाघमारे, संदीप जामदार, अमोल गोरे, राजू कडुसकर, वैभव रायकर उपस्थित होते. तसेच शिरूर शहरातील व तालुक्यातील बारा बलुतेदार ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Harrah's Reno - Casino Finder
ReplyDeleteFind addresses, read reviews, and 논산 출장마사지 contact Harrah's 계룡 출장마사지 Reno using the map. Harrah's Reno 양주 출장마사지 Casino. 777 Harrah's Rincon Way Valley 천안 출장마사지 Center, NV 89449. 전라북도 출장샵