शिरूर (प्रतिनिधी) - पाबळ येथील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची कौतुकाची बातमी मला विचारून का केली नाही तसेच बातमीत विशिष्ट नावे का ...
शिरूर (प्रतिनिधी)-
पाबळ येथील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची कौतुकाची बातमी मला विचारून का केली नाही तसेच बातमीत विशिष्ट नावे का टाकली याचा राग मनात धरून पत्रकारास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्रापूर व पाबळ या गावासाठी सी चोवीस तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत असलेले सुनिल दत्तात्रय पिंगळे यांनी पाबळ येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत आल्याबद्दल बातमी केली होती.
ही बातमी विद्यार्थ्यांच्या कौतुकाची तसेच संस्थेच्या अभिमानाची असताना देखील ही बातमी मला विचारून का केली नाही तसेच बातमीत विशिष्ट नावे का टाकली याचा राग मनात धरून पाबळ(ता.शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी यांनी फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत सुनील दत्तात्रय पिंगळे (रा.पाबळ,ता.शिरूर,जि.पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी संबंधित इसम भगवान घोडेकर यांना शिक्रापूर पोलिस ठाण्यात बोलवुन चौकशी केली असता व पत्रकार सुनिल पिंगळे यांनी आँडिओ रेकॉर्डिंग व यामागील घोडेकर यांची असलेले पार्श्वभूमी व त्यासंदर्भातील वस्तुनिष्ठ
पुरवे सादर केल्यानंतर संबंधित इसम भगवान घोडेकर यांनी पत्रकार सुनिल पिंगळे यांना जीवे मारण्याची धमकी दिले असल्याचे निष्पन्न झाले त्या अंतर्गत धमकी देणे निराधार आरोप करणे असे वक्तव्य घोडेकर यांच्याकडुन घडले असून त्याअंतर्गत भगवान दगडू घोडेकर (वय 58 रा.पाबळ ता. शिरूर, जि.पुणे) यांचे विरुद्धात शिक्रापूर येथे गुन्हा दाखल केला आहे. या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भगवान घोडेकर यांच्यावर काल जिवे मारण्याची धमकी देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुके करत आहेत.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन परिसरातील चांगल्या वाईट घडामोडींचे वार्तांकन करत असतो. त्यामुळे बातमी दिल्याच्या रागातुन पत्रकारांस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे हा प्रकार अतिशय निंदनीय असुन याचा तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निषेध केला.
COMMENTS