शिरूर( प्रतिनिधी)- ' पवार व धारिवाल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून,आमच्यामध्ये कुठलाही गैरसमज नाही.'अशोक पवार आमदार म्हणजे मी आम...
'पवार व धारिवाल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून,आमच्यामध्ये कुठलाही गैरसमज नाही.'अशोक पवार आमदार म्हणजे मी आमदार' अशा स्पष्ट शब्दांत भविष्यातील राजकीय वाटचालीत आमदारांशी कुठलीही स्पर्धा नसल्याचे शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी जाहिर केले.
आमदार अशोक पवार यांची पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळाच्यावतीने त्यांचा बुधवार दि.२६ रोजी येथे उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून आमदार अशोक पवार व सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्यात काहीसा बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.मात्र यावेळी आमदार पवार व सभागृहनेते धारिवाल यांनी बोलताना एकमेकांवर स्तुतीसुमने उधळुन धारिवाल व पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगुन पुर्ण विराम दिला.कार्यक्रमात धारिवाल यांच्या समर्थकांनी प्रकाशभाऊंनापण आमदार करा असे मत व्यक्त केले यावेळी पवार आमदार म्हणजे मीच आमदार असल्यासारखे असुन आमदार पवारांचे शहरातल्या विकासात मोठे सहकार्य मिळत आहे.नगरपरिषदेच्या माध्यमातुन मी शिरूर शहरातच काम करणार असल्याचे सांगितल्याने आमदारकीच्या स्पर्धेत नसल्याचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी स्पष्ट केले.
सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहरात दुरदृष्टीकोन ठेवून मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध व दर्जेदार विकास कामे सुरू असुन धारिवाल यांच्या नेतृत्वातुन झपाट्याने विकास होत असल्याने शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याचे मत यावेळी बोलताना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे,शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.नंदकुमार निकम,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण,घोडगंगा कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर,नगरसेवक मुजफ्फर कुरेशी,मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे,ॲड.रविंद्र खांडरे, निलेश पवार,नगरसेवक अभिजीत पाचर्णे,विठ्ठल पवार,माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे,राजेंद्र लोळगे,
नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्वप्निल भालेकर,मनसुख गुगळे,ॲड.किरण आंबेकर,संतोष भंडारी,किरण पठारे,संजय बारवकर,प्रविण कातोरे यांंसह मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS