कर्जत ( प्रतिनिधी ) - येथील पैलवान चषक 2021 या फुल पीच क्रिकेट स्पर्धेमध्ये कर्णधार सुदाम खोडदे यांचे नेतृत्वाखाली शिरूर चा संकल्प पोलीस 1...
कर्जत ( प्रतिनिधी )- येथील पैलवान चषक 2021 या फुल पीच क्रिकेट स्पर्धेमध्ये कर्णधार सुदाम खोडदे यांचे नेतृत्वाखाली शिरूर चा संकल्प पोलीस 11 संघ ठरला कर्जतच्या पैलवान चषक 2021 चा मानकरी.
आ.प्रवीण दादा घुले पा.(जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी अ.नगर, अध्यक्ष कर्जत तालीम संघ) यांचे वाढदिवसानिमित्त पैलवान चषक 2021 फुल पीच टेनिस क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण 32 नामवंत संघ सहभागी झाले होते,स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आ.प्रवीण दादा घुले
पा.व सहकारी मित्र परिवार, कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
या क्रिकेट स्पर्धेचे लाईव्ह प्रेक्षेपण यू ट्यूब च्या माध्यमातून भारत देशासह बाकी इतर देशात सुध्धा करण्यात आले होते ही स्पर्धा लाखो प्रेक्षकांनी घरबसल्या पाहण्याचा आनंद लुटला.
स्पर्धेचा निकाल -
प्रथम क्रमांक :संकल्प पोलीस 11 शिरूर 77777 रुपये व मानाचा करंडक.
द्वितीय क्रमांक : एस आर पी एफ 11 दौंड 55555 रुपये व करंडक.
तृतीय क्रमांक :देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड 44444 रुपये व करंडक.
चतूर्थ क्रमांक : वाजीद भाई 11 दौंड 33333 रुपये व करंडक.
उत्कृष्ट फलंदाज: कुणाल खोंड(संकल्प पोलीस 11 शिरूर)
उत्कृष्ट गोलंदाज: संतोष कुदळे(संकल्प पोलीस 11 शिरूर)
उत्कृष्ट षटकार: अमित तांबे,शुभम शेळके,कुणाल खोंड(संकल्प पोलीस 11 शिरूर)
मालिकावीर: स्वप्नील भालेराव (दौंड)
संकल्प पोलीस 11 टीम:बाळा शिंदे,राजेश ढगे,राहुल गोगडे,कुणाल खोंड, सुदाम खोडदे,शुभम शेळके,अमित तांबे,मनोज कुरुंदले,विशाल अलभर,शशी वंजारी,सूरज गवळी, मोसीन बागवान,राजदीप भालेराव,संतोष कुदळे,खंडू शेठ शेंडगे,कृष्णा शेठ बोऱ्हाडे
COMMENTS