चिंचणी येथे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात साजरा शिरूर (प्रतिनिधी) शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे कालाष्टमी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव उ...
चिंचणी येथे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात साजरा
शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे कालाष्टमी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शनिवारी दिनांक 27 रोजी रात्री 12:00वाजता श्री. काळभैरवनाथचा जन्मोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी तात्या महाराज पवार यांनी दिली.
यावेळी श्री.काळभैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी फुलांची अरास केली होती व श्री.काळभैरवनाथ व श्री.जोगेश्वरी मातेची मुर्तीवर चंदनाचा लेप देऊन दोन्ही मुर्ती फुलांनी सजवल्या होत्या.तसेच मंदिराच्या सभामंडपात सुद्धा विविध प्रकारच्या सुंदर व मनमोहक फुलांची अरास केली करून देवाचा पाळणा सुद्धा फुलांनी सजावण्यात आला होता.
या नयनरम्य सोहळ्याचा अनुभव तेथे आलेल्या प्रत्येक भाविकांनी घेतला. श्रीनाथ जन्मोत्सव अगोदर ह.भ.प.श्री.कौठाळे महाराज यांचे श्री. काळभैरवनाथ महात्म्य यावर प्रवचन झाले.
रात्रीच्या जन्मोत्सव नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे देवाला अभिषेक घालण्यात आला व देवाची पालखी सकाळी गावातुन वाजत गाजत फिरून मंदिरात आली. तसेच मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदिरात चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व भाविक उपस्थित होते.
यावेळी श्रीभैरवनाथ जयंती उत्सव निमित्त मंदिराची उत्कृष्ट अशी सजावट केल्या बद्दल सुनील साळुंखे याचा चिंचणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
COMMENTS