शिरूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत शिरुर ग्रामिण रुग्णालय येथे कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात...
शिरूर (प्रतिनिधी)-
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत शिरुर ग्रामिण रुग्णालय येथे कुष्ठरोग संदर्भ
सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात
आले अशी माहिती शिरूर ग्रमिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अर्चना शेडे यांनी दिली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन केंद्र,शिरुर ग्रामिण रुग्णालय व आरोग्य विभाग शिरुर यांच्यावतीने कुुुुष्ठरोग रुग्णांना
सेवा पुरवण्यात येणार आहे.सेवा केंद्रातून कुष्ठरोग रुग्णाचे निदान,उपचार,विकृती प्रतिबंध व वैद्यकीय समुपदेशन करण्यात
येणार आहे.रुग्णास ससून हॉस्पिटल पुणे, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे
जावे लागत होते.या संदर्भ सेवा
केंद्रामुळे शिरुर शहर व तालुक्यांंतील रूग्णांना याचा फायदा होणार आहे.कुष्ठरोगामुळे आलेल्या विकृतीचे प्रतिबंध करण्यासाठी वॅक्स बाथ,मसल स्टिम्युलेटर,
भौतिकोपचार देण्यात येणार,तसेच एमसीआर चप्पल,गॉगल्स, स्प्लिंटस, सेल्फकेअर
किट गरजूंना देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर या केंद्रावर रुग्णास सामाजिक व आर्थिक पुनर्वसनसंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अशी माहिती शिरूर ग्रमिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अर्चना शेडे यांनी दिली.
याप्रसंगी पुणे कुष्ठरोग आरोग्यसेवा सहाय्यक संचालक डाॅ.एच.ए.पाटोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.बी.ए.पवार,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.ए.बी.नंदापुरकर,तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ.दामोधर मोरे,वैद्यकिय अधिकारी डाॅ.तुषार पाटील,डाॅ.कैलास बत्ते,डाॅ.राजेंद्र शिंदे यांसह शिरूर ग्रामिण रूग्णालयाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
COMMENTS