सर्वांना बरोबर घेऊन शिरूर शहरातील विकासाकडे वाटचाल सुरू - सभागृहनेते प्रकाश भाऊ धारिवाल शिरूर,(प्रतिनिधी)- शिरुर शहरात नगरपरिषदेच्या माध...
सर्वांना बरोबर घेऊन शिरूर शहरातील विकासाकडे वाटचाल सुरू - सभागृहनेते प्रकाश भाऊ धारिवाल
शिरूर,(प्रतिनिधी)-
शिरुर शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातुन विकास कामे करताना कुठलाही पक्ष व गटतट न पाहता निरपेक्षपणे विकास कामे करत असल्याचे प्रतिपादन शिरूर नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी केले .
शिरुर शहरातील सोनार आळी परिसरातील
डंबेनाला व स्टेटबँक कॉलनी येथील नाल्यांच्या
कामाचे भुमिपुजन प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले .
लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र धनक,
शिरुर शहर विकास आघाडी अध्यक्ष सुभाष पवार, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक शरद कालेवार, बांधकाम सभापती अभिजीत पाचारणे स्वच्छता सभापती विठ्ठल पवार, नगरसेविका उज्वलाताई बरमेचा मनीषा कालेवार,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी , नगरसेवक संजय देशमुख, मंगेश खांडरे, नगरसेविका रेश्मा लोखंडे, पूजा जाधव , संगीता मल्लाव,भाजपा शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, पोपट कुरंदळे, जयंत साळुंके, या सह नगरसेवक, नगरसेविका व कॉलनी परिसरातील स्थानिक नागरीक उपस्थित होते .
नगरसेवक मंगेश खांडरे व नगरसेविका मनिषा कालेवार यांच्या प्रभागातील
डंबेनाला ,सोनारआळी या शिरुर शहराच्या मध्यवर्ती भागातून मुख्य चेंबर नदीपर्यंत जाणाऱ्या भुयारी गटार
नाल्या चे सुवर्णजयंती नगरोस्थान निधी तुन
बळकटीकरण व सुशोभीकरण करण्याचे
सुमारे ७३ लाख ४२ हजार ९६० रुपयांच्या कामाचे व स्टेट बँक कॉलनी येथे सुवर्णजयंती नगरोस्थान निधीतुन नाला बळकटीकरण व सुशोभिकरण ७३ लाख ३५ हजार व ६२ लाख ८७ हजार रुपये यामुळें शहरातली वैभवात भर पडणार आहे.
यावेळी पुढे बोलताना
सभागृह नेते प्रकाश धारीवाल म्हणाले की,
सन २००७ ते आजपर्यंत दिलेली सर्व कामे निविदा रकमेपेक्षा कमी रकमेने देऊन दर्जेदार कामे करून घेतली आहे . या मु ळे नगर परिषदेचे करोडो रुपये वाचले असल्या चे सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी सांगितले .
COMMENTS