तालुका व शहराची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिरूर (प्रतिनिधी) - भारतीय मराठा महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी येथील सामाजिक ...
तालुका व शहराची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
शिरूर (प्रतिनिधी) - भारतीय मराठा महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक आबासाहेब सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच एन टीव्ही न्यूज चे पत्रकार अनिल सोनवणेे यांची शिरूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.
यावेळी प्रभारी पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड, प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष शोभना पाचंगे, प्रभारी युवक जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे या मान्यवरांच्या तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी समाज सभासद व समाज बांधव यांच्या उपस्थितीत या निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे शिरूर तालुका प्रसिद्धी प्रमुख अनिल सोनवणे, शिरूर तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे,शिरूर तालुका महिला अध्यक्षा शशिकला काळे, शिरूर तालुका युवक अध्यक्ष गणेश सरोदे,शिरूर तालुका युवक अध्यक्षा प्रियंका वाळके,
शिरूर शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे शिरूर शहर अध्यक्ष अनिल डांगे,शिरूर शहर महिला अध्यक्षा उर्मिला फलके,शिरूर शहर युवक अध्यक्ष सचिन जाधव,शिरूर शहर युवक सरचिटणीस अनिरुद्ध ऊर्फ रुद्रा राखुंडे, शिरूर शहर युवती अध्यक्ष पूजा पंदरकर यांची निवड करण्यात आली.
मराठा समाजातील तळागाळातील समाज बांधवांच्या विकासासाठी काम करणार असल्याचे नूतन तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबासाहेब सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निवडीला अविनाश जाधव, वर्षाताई काळे, शैलजा दुर्गे, जिजाताई दुर्गे, दादासाहेब भोंडवे, राहुल शिंदे, संपत दसगुडे, जालिंदर कुरुंदळे, वैशाली गायकवाड, राणी कर्डीले, ठुबे ताई, नंदू जाधव, बाबा जाधव, संतोष पाचर्णे, सुनिल डांगे उपस्थित होते.
यावेळी प्रभारी जिल्हा अध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी सर्व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
COMMENTS