शि रूर (प्रतिनिधी ) - माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी 24सप्टेंबर 1995 रोजी राष्टीय चर्मकार महासंघ या संघटनेची स्थापन...
शिरूर (प्रतिनिधी )- माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी 24सप्टेंबर 1995 रोजी राष्टीय चर्मकार महासंघ या संघटनेची स्थापना केल्यामुळे समाजावरील अन्याय , अत्याचाराला वाचा फोडली.समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक व शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी देशभर चर्मकार समाजाची मोठी ताकद निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे जिल्हाअध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे यांनी केले
शिरुर येथील महासंघाच्या पुणे जिल्हा कार्यालयात पुणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या 27 व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी राळेगण सिद्धीचे माजी सरपंच व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य सदस्य विलास पोटे,शिरुर तालुका अध्यक्ष तुषार आडसुळ, जिल्हा सदस्य निलेश ढवळे ,तालुका उपाध्यक्ष रमेश जगताप, शिरुर शहर अध्यक्ष विशाल पोटे शहर उपाध्यक्ष कैलास सातपुते,आदि यावेळी उपस्थित होते.
महासंघाच्या 27व्या वर्धापन दिनानिम्मत विविध उपक्रमांची योजना करण्यात होते. शिरुर नगरपालिका शाळेतील शिक्षिका अंजली सुनिल माने यांना राज्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे औरंगाबाद येथे होणारा समारंभात राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते मिळणार आहे .या पार्श्वभूमीवर महासंघाच्या वतीने अंजली माने यांचा सत्कार करण्यात आला.
राज्य शाखेने गुरु रविदासांची ध्यानस्थ मुद्रा असणारी प्रतिमा पुरविण्यात आली होती या प्रतिमांचे कार्यकर्ते ना वितरण करण्यात आले. तसेच या वेळी ऑनलाईन सभासद नोंदणी करण्यात आली .
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या 27 वर्षांची वाटचालीचा यशोगाथा पुणे जिल्हा अध्यक्ष विजेंद्र गद्रे यांनी मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासंघाचे पुणे जिल्हा सचिव प्रा सुनिल माने यांनी केले तर आभार प्रदर्शन शिरुर तालुका अध्यक्ष तुषार आडसुळ यांनी केले
COMMENTS