शिरूर (प्रतिनिधी)- सोमवार दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यावेळ...
शिरूर (प्रतिनिधी)- सोमवार दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यावेळी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची हाताची दोन बोटे कापली गेली,तसेच त्यांच्या डोक्यास मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या घटनेचा शिरूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिरूर नगरपरिषदे कर्मचारी व अधिकारी संघटनेकडून करण्यात आली.
हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण प्रशासनास जायबंदी करतात.त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 31/08/2021 रोजी
शिरूर नगरपरिषदेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज कडकडीत रित्या बंद करण्यात येत आहे.
यावेळी शिरूर नगरपरिषदे कर्मचारी अधिकारी संघटने कडून काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. यावेळी कामगार संघटना सचिव एकनाथ गायकवाड, पाणी पुरवठा अभियंता टेकचंद नेमाडे, भगवान दळवी, रविंद्र वारे, आयूब सय्यद,चंद्रकांत पठारे, अनिल चव्हाण, उपेंद्र पोटे, अमृत भवर, दिलीप वाघमारे, प्रमोद पवार, अभियंता तारडे, कांचन,सुडके सुप्रिया बो-हाडे इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
COMMENTS