पुणे, पिंपळे गुरव (प्रतिनिधी)- आयुर्वेदामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर प्रवीण बढे सर यांना ओम साई फाउंडेशन यांच्या माध्यमातून ...
पुणे, पिंपळे गुरव (प्रतिनिधी)-आयुर्वेदामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर प्रवीण बढे सर यांना ओम साई फाउंडेशन यांच्या माध्यमातून "देवदूत गौरव पुरस्कार" 2021 तसेच कोरोना योद्धा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई(माई) ढोरे तसेच उपमहापौर हिरा (नानी) घुले तसेच ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर प्रविण बडे सर यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून तीन लाखाहून अधिक पेशंटस बरे केले आहे.कोरोनाच्या काळात लाखाहून अधिक रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून बरे करण्यात आले.त्याची नोंद घेऊन सरांना नुकताच "शौर्य भारत पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले आहे.डॉक्टर प्रविण बढे यांच्या या कामगिरी मुळे पिंपरी चिंचवडला ही सन्मान मिळाला आहे.
तसेच नॅचरोपॅथी सायन्स मध्ये डिग्री असलेल्या सरांना अलीकडेच पीएचडी देऊन डॉक्टरेट डिग्री बहाल करण्यात आली.त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना "देवदूत गौरव पुरस्कार" देऊन ओम साई फाउंडेशन अध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना समीतीचे संजय मराठे यांनी हे एक उत्कृष्ट काम केले आहे त्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते असे पिंपरी-चिंचवडच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे म्हणाल्या.
त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भोसले,शिलरत्न गायकवाड,संजय यलभार,रोहित शिंगाडे,सचिन पवार,प्रवीण भोसले,अविनाश भोसले तसेच सुनिता गायकवाड,डॉक्टर अंजली अभ्यंकर,तृप्ती जगताप,अनिता लोंढे आणि चंदा मानवतकर यांची उपस्थिती राहिली.तसेच सूत्रसंचालन अतुल जगताप आणि आभार प्रदर्शन सोमनाथ जगताप यांनी केले.
COMMENTS