शिरूर,शिक्रापूर (प्रतिनिधी) - शिरूर तालुक्यातील मौजे पिंपळे जगताप येथील गट क्रमांक 420 /2 मधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव ठ...
शिरूर,शिक्रापूर (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यातील मौजे पिंपळे जगताप येथील गट क्रमांक 420 /2 मधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवलेल्या भूखंड 15 व त्यालगत असणारे भूखंडावर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले होते.
यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवलेल्याअतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली.
या कारवाईला अल्पशा प्रमाणात विरोध झाला. सदरची कारवाई राहती घरे वगळता इतर निष्कासित करण्यात आली.
या कारवाईत शिरूर तहसीलदार लैला शेख, शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, कोरेगाव-भीमा मंडळअधिकारी विकास फुके ,मंडळ अधिकारी प्रशांत शेटे,तलाठी घोडे तसेच महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी भूमी अभिलेख कर्मचारी सदर कारवाई करताना उपस्थित होते.
COMMENTS