शिरूर शिवसैनिकांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जोडे मारून केला निषेध शिरूर (प्रतिनिधी) - केंद्रीय मंत्री न...
शिरूर शिवसैनिकांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जोडे मारून केला निषेध
शिरूर (प्रतिनिधी) - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याबाबत काल बेताल वक्तव्य केले होते. या बेताल वक्तव्याचा शिरूर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत निषेध व्यक्त केला.
शिरूर तहसील कार्यालय पोलीस स्टेशन येथे शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच नारायण राणे यांच्या प्रतिमेस शिवसेना महिला आघाडीच्या वतीने व शिवसैनिकांनी जोडे मारत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.तसेच शिरूरच्या तहसीलदार एल. डी. शेख व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा सल्लागार अनिल काशीद, जिल्हा उपप्रमुख पोपट शेलार, शैलजा दुर्गे, शिरूर - आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार,शहर प्रमुख मयूर थोरात, आनंदराव हजारे, सुरेश गाडेकर, पप्पू गव्हाणे, भरत जोशी, सतीश घोडके , प्रदीप साळवे, हितेश शहा,पोपट ढवळे, सुनील जठार, अमोल हरगुडे, गोरक्ष करंजुले, निखिल शिंदे ,सुनील गुप्ता, शाखाप्रमुख नितीन जामदार,सुनील चौधरी, उपशाखाप्रमुख अमोल गोरे,अनिल लोंढे,उपशहर प्रमुख संदीप जामदार,आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
COMMENTS