शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांचे अनेक किस्से आता बाहेर येत आहेत. त्या पैकीच एक किस्सा न्हावरे पोलीस चौकीचा आह...
शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांचे अनेक किस्से आता बाहेर येत आहेत. त्या पैकीच एक किस्सा न्हावरे पोलीस चौकीचा आहे.
न्हावरे येथील पोलीस चौकीचा पदभार एका पोलीस उपनिरीक्षकाला दिला होता. त्या उपनिरीक्षकाने न्हावरे परिसरातील अवैध व्यवसायावर धडाकेबाज कारवाई करत पोलीस प्रशासनाचा वचक निर्माण केला होता.
न्हावरे येथील बस स्थानकासमोर एका टपरीवर कल्याण-मुंबई नावाचा मटका घेत असलेल्या व्यक्तीवर कारवाई करून गुन्हा दाखल केला होता.तसेच हा मटका शिरूर येथील मटका बुकींच्या सांगण्यावरून चालवत होता म्हणून त्याच्यावर सुद्धा कारवाई करून गुन्हा दाखल केला.नेमकी हिच कारवाई पोलीस निरीक्षक साहेब यांना रुचली नाही. कारण की शिरूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मटका सुरु आहे, शिरूर येथील बुकीं त्याच्या एजंटामार्फत मटका चालवत होता. तरी सुद्धा त्याच्यावर शिरूर शहरात कधीच कारवाई झाली नाही हे विशेष .
शिरूर पोलिसांनी एकदा एका मटका बुकींच्या एजंटावर कारवाई केली होती, त्यावेळी मटका बुकीने पोलीस स्टेशनला येऊन एका कर्मचाऱ्यांला मोठ-मोठ्यांनी बोलत होता. तो म्हणाला की "आम्ही तुम्हाला हप्ते देतो,मग तुम्ही आमच्यावर का कारवाई करता", असे बोलून त्याने चांगलाच गोंधळ घातला होता. त्या पोलीस कर्मचाऱ्याने कसेबसे त्या मटका बुकीला समजावून सांगून शांत करत परत पाठवले. याची चर्चा शिरूर पोलीस स्टेशन सह शहरांमध्ये चांगलीच रंगली होती.
तसेच संबंधित अधिकाऱ्याने न्हावरे परिसरातील वाळू वाहतुकीवर सुद्धा चांगलाच वचक बसवला होता.
परंतु हिच बाब पोलीस निरीक्षकाला रुचली नाही. यामुळे पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकारी यांच्यात खटके उडू लागले.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वाद एवढे विकोपाला गेली की चक्क पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिन मध्येच हमरीतुमरी झाल्याची चर्चा आहे. याचा राग मनामध्ये ठेवून संबंधित अधिकाऱ्यास मानसिक त्रास देण्यात येऊ लागला.या त्रासाला कंटाळून संबंधित अधिकारी यांनी पोलीस निरीक्षकाची पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली असल्याची चर्चा रंगू लागली. त्यातच एक वसुली पंटर कर्मचारी याने न्हावरे हद्दीतील वाळू व्यावसायिकाला मोबाईलवरून सरळ सरळ हप्त्याची मागणी केली. त्या मध्ये त्यांनी अजून दोन पोलीस कर्मचारी यांचे नाव घेतले. या संभाषणाची ऑडिओ क्लिप पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना पाठवली असल्याचे समजते. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक यांनी एका कर्मचाऱ्यांची निलंबन केले तर दोन कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली केली.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी स्वरूपात अनेक तक्रारी केल्याचे समजते. ( क्रमशः )
COMMENTS