शिरूर (प्रतिनिधी)- शिरूर पोलीसठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.अवैध व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात हप्ता...
शिरूर (प्रतिनिधी)- शिरूर पोलीसठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.अवैध व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली करून अवैध व्यावसायिकांना अभय दिल्यामुळेच त्यांच्यातील संघर्ष वाढत गेल्याचे अनेक घटना घडल्या आहेत.
बेट भागातील टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलीस चौकी आहे. त्या भागामध्ये अनेक अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. तसेच त्या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याचे समजते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यवसाइका मध्येच वाद होऊन खुणाची घटना घडली तरी सुद्धा तेथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण कार्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे समजते.
टाकळी हाजी पोलिस चौकीला एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नेमणूक केली होती संबंधित सपोनि यांनी बेट भागातील टाकळी हाजी पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री विरोधात मोठी मोहीम हाती घेतली होती. अनेक हातभट्ट्या त्यांनी उध्वस्त केल्या तसेच हॉटेल व धाब्यावरती कारवाई करून अवैद्य दारू विकणाऱ्या मध्ये पोलीस खात्याची दहशत निर्माण केली होती. हातभट्टी व्यवसायिकांना कच्चामाल पुरवठा करणाऱ्या शिरूर शहरातील व्यापार्यावर गुन्हा दाखल करून खळबळ उडवून दिली होती.संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची सर्वत्र चर्चा होऊन त्या अधिकाऱ्याचे व पोलिस प्रशासनाचे नागरिकांनी कौतुक केले होते.
मात्र पोलीस निरीक्षक यांना ही कारवाई रुचली नाही. कारण संबंधित हात भट्टी दारू व्यावसायिक व हॉटेलवर दारू विकणारे व्यवसायिक वसुली बहाद्दर यांच्या मार्फत पोलीस निरीक्षकांना महिन्याला मोठा मलिदा देत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. या रागातून पोलीस निरीक्षक यांनी संबंधित सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा टाकळी हाजी चौकीचा पदभार काढून घेत अधिकाऱ्यास मानसिक त्रास दिल्याची चर्चा शिरूर पोलिस स्टेशनच्या परिसरामध्ये होत आहे.
या मानसिक त्रासाला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी हि वैतागले असून सर्वसामान्य नागरिक तक्रार घेऊन आल्यास दिवस दिवसभर पोलीस ठाण्यामध्ये बसून ठेवून तक्रारदारास मोठा मानसिक त्रास दिल्याचे अनेक प्रकार पोलीस ठाण्यात घडल्याचे समजते आहे. संबंधित अधिकारी पोलीस ठाण्यात येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार घेतली जात नसे कारण ठाणे अमलदारास तशा सूचना दिल्या असल्याचे समजते आहे. पोलीस निरीक्षकांच्या अशा अनेक तक्रारी व कारणामे पुढे येत आहेत. ( क्रमशः )......
COMMENTS