पाथर्डी (प्रतिनिधी) - पिंपळगाव टप्पा (पाथर्डी) येथे शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील नामवंत 'शिरसाट स्पोर्ट्स करंड...
पाथर्डी (प्रतिनिधी)- पिंपळगाव टप्पा (पाथर्डी) येथे शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील नामवंत 'शिरसाट स्पोर्ट्स करंडक २०२१'फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेत शिरूरच्या संकल्प पोलीस 11 संघाने तृतीय क्रमांक मिळवत 41,111रुपये व मानाचा करंडकावर नाव कोरले.
स्पर्धेत राज्यातील नामवंत ४१ संघांना सहभागी करून घेण्यात आले होते. या स्पर्धेचे विशेष म्हणजे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय लूक देण्यात आला होता. विजेत्या प्रथम आठ संघांना ह.भ.प. महंत आदिनाथ महाराज शास्त्री व शेवगाव - पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेजर सतीश शिरसाट, एअर इंडिया इंजिनिअर अमोल शिरसाट, अर्जुन वणवे सर व शिरसाट स्पोर्ट्सच्या सहकारी कार्यकर्त्यांचे तसेच स्थानिक ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
लाखों प्रेक्षकांनी घेतला लाइव्ह स्पर्धेचा आनंद घेतला.पिंपळगाव टप्पा येथे पार पडलेल्या नामवंत क्रिकेट स्पर्धेचा लाईव्ह आनंद सुमारे दोन लाखांहून अधिक प्रेक्षकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे पाच दिवस आयोजित केलेली ही स्पर्धा भारत देशासह दुबई, कतार सारख्या आखाती देशांमधील प्रेक्षकांनी पाहिली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान ट्रायडंट, नवी मुंबई या संघाने मिळवला तर द्वितीय क्रमांक गहिनीनाथ दादा स्पोर्ट्स फाऊंडेशन,तृतीय क्रमांक संकल्प पोलीस इलेव्हन, शिरूर (कर्णधार सुदाम खोडदे),चतुर्थ क्रमांक सार्थक इलेव्हन, उरण - पनवेल,पाचवा क्रमांक आमदार निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर,सहावा क्रमांक कासार सिरशी क्रिकेट क्लब,सातवा क्रमांक ऑल माॅनस्टर रायगड,आठवा क्रमांक गोविंद युनायटेड उमरगा इलेव्हन हे आठ संघ विजेते ठरले आहेत.तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून संदिप मकवाना,उत्कृष्ट गोलंदाज बिलाल शेख,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमित तांबे(संकल्प पोलीस 11 शिरूर) यांचा सन्मान केला तर किरण खोबरे यांनी विकेट हट्रिक चा मान मिळवला.
COMMENTS