शिक्रापूर (प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरूर येथील काही गावातील पवार कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या अतिक्रमण बाबत जिल्हाधि...
शिक्रापूर (प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरूर येथील काही गावातील पवार कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या अतिक्रमण बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याच्या रागातून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी एका युवकाला शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत मध्ये शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांचे पुतणे असलेले राहुल सुरेश उमाप हे ग्रामपंचायत सदस्य आहेत , सध्या गावातील ग्रामस्थ असलेले गोरक्ष पवार, शरद उमाप, नामदेव उमाप, निलेश उमाप, आप्पा मोरे व नवनाथ इंगवले यांनी ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार यांनी केलेल्या अतिक्रमण बाबत पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार यांचे सदस्यपद रद्द करण्याबाबत मागणी केली आहे, त्यामुळे चिडून जाऊन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी गोरक्ष पवार यांना वारंवार फोन करून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच फोन चालू असताना काढा असे म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला याबाबत गोरक्ष तुकाराम पवार वय ४५ वर्षे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून गोरक्ष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत गोरक्ष पवार यांचे भाडेकरू असलेल्या महिलेला देखील शिवीगाळ करून खोली खाली करा अशी दमदाटी केली असल्याचे देखील म्हटले आहे याबाबत शिक्रापूर पोलिसांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बाबासाहेब पवार रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.
COMMENTS