रांजणगाव पोलिसांची कामगिरी कारेगाव येथील इलेक्ट्रॉनिक दुकान फोडीतील आरोपींना भोपाळ येथून केले जेरबंद! शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर तालु...
रांजणगाव पोलिसांची कामगिरी कारेगाव येथील इलेक्ट्रॉनिक दुकान फोडीतील आरोपींना भोपाळ येथून केले जेरबंद!
शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर तालुक्यातील रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास श्री समर्थ मोबाईल & वाॅच कारेगाव या दुकानातील मोबाईल, लॅपटाॅप, घडयाळे व इतर इलेक्ट्राॅनिक वस्तू असा साधारण 2 लाखाचा माल चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकून चोरून घेऊन गेले होते.
याबाबत रांजणगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं.303/21 IPC 380, 461 कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांच्या सूचनेवरून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते,दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस, तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.बळवंत मांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुभाष मुंडे, पो.काॅ.2841 शिंदे, पो.काॅ. 2817 कुतवळ यांनी आरोपीची आरोपीची गोपनीय माहिती काढुन सायबर क्राईमचे काळी यांचे मदतीने माहिती काढून आरोपी हे भोपाळ मध्य प्रदेश येथे असल्याचे समजताच भोपाळ येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे लकेश लोकचंद पटले वय 23 व्यवसाय नोकरी रा. कारेगाव त. शिरूर जिल्हा पुणे मूळ गोपालपुर थाना कारणगी जिल्हा बालाघाट, रितिक अनिल धमगाये वय 21व्यवसाय नोकरी . कारेगाव त. शिरूर जिल्हा पुणे मूळ जरीपटका साई मंदिर सुनिल किराणा खुशी नगर ता. जिल्हा नागपूर,शशांक राजेंद्र सहारे वय 22 व्यवसाय नोकरी . कारेगाव त. शिरूर जिल्हा पुणे मूळ जरीपटका साई मंदिर सुनिल किराणा खुशी नगर ता. जिल्हा नागपूर अशी सांगितले.
सदरील आरोपींकडून चोरलेले मोबाईल व घडयाळ असा 2 लाखाचा गेलेला माल ताब्यात घेण्यात आला. रांजणगाव पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केल.पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे. सहकारी पोलीस उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी तत्काळ गुन्हा उघडकीस करून आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल अधिकार्यांकडून ही कौतुक होत आहे.
COMMENTS