पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी रांजणगाव पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात उघडली मोहीम! ढोक सांगवी हद्दीत दीड...
पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी रांजणगाव पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात उघडली मोहीम! ढोक सांगवी हद्दीत दीडशे किलो गांजा पकडून इशाराच दिला भारी!
शिरूर ( प्रतिनिधी )- पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी नुकताच रांजणगाव पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाईची धडक मोहीम हाती घेत ढोकसांगवी च्या हद्दीत धडक कारवाई करत सुमारे 35 लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेऊन दोन आरोपींना अटक केली. या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात मोठी खळबळ उडाली आहे.
ढोकसांगवी गावच्या हद्दीतील परीटवाडी येथे 35 लाख 50 हजार रुपयांचा गांजा मुद्देमालासह केला जप्त दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार
ढोक सांगवी गावचे हद्दीतील परीट वाडी येथे एका महिलेकडे स्विफ्ट गाडीतून दोनजण गांजा विक्री साठी घेऊन येणार असे खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक मांडगे यांना मिळाली.
यावेळी तात्काळ सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड यांना मिळालेली बातमीचा आशेय सांगून कारवाई करण्याची परवानगी घेतली. तसेच तिथे छापा टाकण्या अगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण करून बातमी मिळाले ठिकाणी दोन पोलीस पथका सह छापा टाकण्यात आला.
या कामगिरीत पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलीस हवालदार संतोष औटी, वैभव मोरे, विलास आंबेकर, ज्ञानेश्वर शिंदे, पो.ना.भाग्यश्री जाधव, उमेश कुतवळ, विजय शिंदे, म.पो.कॉ. मनीषा घुले,यांनी सदर ठिकाणी जाऊन रोडच्या दोन्ही बाजूंला सापळा लावून थांबले असता परीटवाडी रस्त्याला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जाताना दिसली.
सदरची गाडी पंचर झाल्याने टायर बदलण्यासाठी गाडीतील व्यक्ती खाली उतरले असता पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी या गाडीतील व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन शेतामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे व उमेश कुतवळ यांनी पाठलाग करून पकडले. यावेळी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये जवळपास दीडशे किलो वजनाचा गांजाचे सहा पोते आढळून आले या गांज्याची किंमत जवळपास तीस लाख व स्विफ्ट डिझायर गाडी असे मिळून एकूण 35 लाख चोपन्न हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी किरण आजिनाथ गायकवाड (वय 29 वर्षे, रा. मिलिंद नगर,आंबेडकर पुतळ्याजवळ ता. जामखेड जि. अहमदनगर) व मौलाना सत्तार शेख (वय 27 वर्ष रा.तपनेश्वर रोड, हाडोळा, ता. जामखेड जि.अहमदनगर दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. सदरचा गांजा ढोकसांगवी येथील दोन महिलांना विक्री करण्यासाठी घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला अमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियम 1985 चे कलम 8(क),20( ब),(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही आरोपींना शिरूर न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी दौंड राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे पोलीस,उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलीस हवालदार संतोष औटी,वैभव मोरे,विलास आंबेकर,पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे हे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांची नुकतीच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नियुक्ती झाली आहे.
त्यांनी पोलीस स्टेशनची सूत्रे हातात घेताच ही धडाकेबाज कामगिरी केल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले.
COMMENTS