1 कोटी 54 हजार 540 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत पुणे (प्रतिनिधी ) - यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीला अ...
1 कोटी 54 हजार 540 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
पुणे (प्रतिनिधी )- यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीला अवघ्या 72 तासात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अध्यक्ष डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि. 03/08/2021 रोजी श्री. हितेंद्र बाळासाो जाधव, रा. वाघोशी, ता. फलटण, जि. सातारा हे दि. 02/08/2021 रोजी लातूर ते मुंबई या एस.टी.बसमधून सोलापूर ते पुणे हायवे रोडने प्रवास करीत होते. त्यावेळेस चार अनोळखी आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून एस.टी.बसला गाडी आडवी मारून मारहाण व दमदाटी करून त्यांचे ताब्यातील रोख रक्कम, सोन्यांचे दागिने असा एकुण रू. 1,12,36,860/- किंमतीचा मुद्देमाल लुटून नेला याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी हे फरार झाले होते.
सदरचा गुन्ह्या हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दखल घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तातडीने तपास करण्याचे सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आपली यंत्रणा कामास लावत स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, पोलीस उप निरीक्षक श्री. शिवाजी ननवरे, सहा.फौज.पंधारे, शब्बीर पठाण, पो.हवा.राजू मोमीन, जनार्दन शेळके, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना.अजित भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, पो.काॅ.धिरज जाधव, बाळासाहेब खडके, चा.पो.काॅ.दगडू विरकर, काशीनाथ राजापूरे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केलेले होते.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा वरूडे येथील गणेश भोसले व त्याचा भाऊ रामदास भोसले यांनी त्याचे इतर साथिदारांसह केला असल्याची माहीती मिळाल्याने सदर आरोपींचा शोध चालु असतानाच गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रामदास भोसले हा खराडी बायपास येथे त्याचे साथिदारांसह पळून जाण्याचे तयारीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ खराडी बायपास येथे जावून तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे रामदास भाऊसाहेब भोसले, वय 30 वर्षे, रा. वरूडे, ता. शिरूर, जि. पुणे, तुषार बबन तांबे, वय 22 वर्षे, रा. वरूडे, ता. शिरूर, जि. पुणे, भरत शहाजी बांगर, वय 36 वर्षे, रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर, जि. पुणे असे सांगितले. त्यांचेकडून गुन्हयातील चोरलेल्या मालापैकी तुषार बबन तांबे याचेकडून रू. 1,50,000/- तसेच भरत शहाजी बांगर याचेकडून रू. 30,000/- जप्त केलेले आहेत तसेच रामदास भाऊसाहेब भोसले याने त्याचे शेतातील ऊसाचे शेतात लपवून ठेवलेले रू.91,03,040/- किंमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याकडून एकुण रू. 92 लाख 84 हजार 540 जप्त करण्यात पोलीसांना अभुतपुर्व यश आलेले आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट कार, बुलेट मोटार सायकल, ज्युपीटर मोटार सायकल जप्त केलेली असून एकुण रू. 1,00,54,540/- किंमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्यासह पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर गुन्हयातील आरोपी रामदास भाऊसाहेब भोसले याचा भरत शहाजी बांगर हा बहीणीचा पती आहे इतर आरोपी हे त्यांचे मित्र आहेत, सदर गुन्हयात आणखी आरोपीचा सहभाग आहे काय बाबत तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि.श्री. भाऊसाहेब पाटील, यवत पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
COMMENTS