शिरूर (प्रतिनिधी) - पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा धडाका स...
शिरूर (प्रतिनिधी) - पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे.
शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे ओम साई हॉटेल लॉज येथील मॅनेजर व लॉज चालक हे तीन महिलांकडून देह व्यापार करून घेऊन त्यातून पैशांची कमाई करत असल्याचे खात्रीपूर्वक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळताच बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने सदर बतमीबाबत अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांचेशी संपर्क साधला. बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पुणे ग्रामीण स्था.गु.अ. शाखेच्या महिला भरोसा सेल च्या म. पो. उप निरीक्षक माधवी देशमुख, यांना बोलावून सपोनि सचिन काळे यांचेसह एक पथक तयार करून कारवाई करण्यास सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला भरोसा सेल च्या पथकासह पथक कारेगाव येथे कारवाई करिता पोहचल्या. पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख यांनी दोन पंच बोलवून बातमीवर यशस्वी कारवाई करणेकरिता एक योजना आखली आणि एक इसम बनावट ग्राहक म्हणून बोलवून घेतला, आणि त्यास दोन 500 रु च्या नोटा देऊन त्यास ओम साई लॉज येथे बनावट ग्राहक म्हणून जाण्यास सांगितले आणि बातमीची खात्री झाल्यानंतर इशारा करण्यास सांगितले, अशी योजना तयार केली. म पो स ई माधवी देशमुख यांच्या योजनेस यश आले आणि ओम साई लॉजवर पाठविणेत आलेल्या बनावट ग्राहकाने दिलेल्या इशारा करताच पथकाने तातडीने लॉजवर छापा टाकून कारवाई केली.
कारवाई मध्ये ओम साई लॉज चा मॅनेजर शिवकांत सत्यदेव कश्यप आणि चालक पारस बस्तीमल परमार दोघे राहणार ओम साई लॉज सरदवाडी ता शिरूर जि पुणे असे दोघेजण मिळून आले . हे दोघेजण तीन महिलांकडून देह अपव्यापार करून घेताना मिळून आले, आणि तीन पीडित महिला मिळून आल्या. मपोसई माधवी देशमुख व सपोनि सचिन काळे यांचे पथकाने धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन तीन पीडित महिलांची सुटका केली असून महिला सहा फौजदार लता जगताप यांनी सदर प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. राहुल धस यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट
सपोनि सचिन काळे, मपोसई माधवी देशमुख,सहा फौज शब्बीर पठाण,सहा फौज तुषार पंधारे,म सहा फौज लता जगताप ,पो. हवा. सचिन घाडगे, पो. हवा. जनार्धन शेळके, पो. हवा. राजु मोमीन, पो. ना. मंगेश थिगळे,
पो. ना. अजित भुजबळ, म पो. कॉ. पूनम गुंड,चा. पो हवा मुकेश कदम यांनी केली आहे.
सदरच्या यशस्वी कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत असून,शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व वेश्याव्यवसाय, अवैध गुटखा विक्री सुरू असून कारवाई करण्याची मागणी नागरीकातून होत आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शिरूर तालुक्यात सुरू असलेले अवैद्य व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याचा शोध घेऊन संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
COMMENTS