रेकॉर्ड वरील फरार आरोपी ताब्यात मावळ (प्रतिनिधी ) -दिनांक ०३ /०८/२०२१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक...
रेकॉर्ड वरील फरार आरोपी ताब्यात
मावळ (प्रतिनिधी )-दिनांक ०३ /०८/२०२१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील फरार आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव रेल्वे स्टेशन जवळ तलावालागत असलेल्या मोकळ्या मैदानात ता.मावळ जि.पुणे येथे संशयास्पद हालचाली करून फिरत असणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले.
सदरील व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव कुणाल बाबाजी हरपुढे वय १८ रा.ढोरेवाडा मोरे चौक ता.वडगाव मावळ जि.पुणे असे सांगितले. त्याच्या ताब्यात घेवून त्याचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला बाळगलेले ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस एकुण किं.रु.५०,१००/- ( पन्नास हजार शंभर रुपये) चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर पिस्टल कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा पिस्टल मध्य प्रदेश येथून विकत आणल्याचे सांगितले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली,पो.उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे,पो.हवा. प्रकाश वाघमारे ,पोहवा मुकुंद आयचीत,पो कॉ. प्राण येवले,पो कॉ बाळासाहेब खडके
पो कॉ.अक्षय जावळे यांचे पथकाने केली.
COMMENTS