शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रवीण चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिरूरचे दुय्यम निबंधक श...
शिरूर (प्रतिनिधी)- शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रवीण चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिरूरचे दुय्यम निबंधक शंकर कुंभार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रवीण चोरडिया यांच्या निवडीने व्यापारी वर्गात आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ॲड.अशोकबापु पवार, माजी आमदार पोपटरावजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर तालुकाध्यक्ष रविबापु काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.वसंतकाका कोरेकर, संचालक शशिकांत दसगुडे, शंकर जांभळकर, मानसिंग पाचुंदकर, विश्वासकाका ढमढेरे, विकास शिवले, आबाराजे मांढरे, विजेंद्र गद्रे, सतिष कोळपे,सुदीप गुंदेचा, बंडु जाधव, मंदाकिनी पवार, छायाताई बेनके, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, रंगनाथ थोरात, आप्पासाहेब बेनके, पंडीत दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले, संचालक, पदाधिकारी व कर्मचारीउपस्थित होते.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटरावजी गावडे यांच्या हस्ते नवनियुक्त उपसभापती प्रवीण चोरडिया व शिरूरचे दुय्यम निबंधक शंकर कुंभार यांचा सन्मान करण्यात आला. प्रवीण चोरडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS