पिंपळे गुरव ( संजय मराठे )- भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिक स्पर्धे तब्बल 41 वर्षां नंतर ब्राँझ पदक जिंकून मोठे ऐतिहासिक यश संपादन केले आहे त...
पिंपळे गुरव ( संजय मराठे )- भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिक स्पर्धे तब्बल 41 वर्षां नंतर ब्राँझ पदक जिंकून मोठे ऐतिहासिक यश संपादन केले आहे त्यामुळे भारताचे संपूर्ण जगाभरात नाव लौकिक झालेले आहे.त्यांच्या या अविस्मरणीय कामगिरीबद्दल सृष्टी चौक,पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शना मध्ये ओम साई फाउंडेशन यांच्या वतीने न्यू मिलेनियम स्कूलच्या हॉकी खेळाडूंना व नागरिकांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
नगरसेविका उषाताई मुंढे म्हणाले की भारतीय खेळाडूंनी ओलंपिक स्पर्धेमध्ये जे काही मेडल्स मिळवली आहेत त्या मागे त्या सर्व खेळाडूंचे त्यांच्या गुरुजनांचे खूप मोठे कष्ट आहेत व त्या कष्टांचे फळ आज त्यांना मेडल रुपी मिळाले आहे.
ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की आज भारताचे धावपट्टू (फ्लाईंग मेन) मिल्खा सिंग यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली गेली आहे.कारण मिल्का सिंग यांची इच्छा होती की भारतातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन जास्तीत जास्त पदक मिळवावे.हॉकी संघाने केलेली ही कामगिरी सुवर्णा अक्षरात लिहली जाणार आहे.
त्यावेळी नगरसेविका उषा ताई मुंढे संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे,राष्ट्रीय हाँकी कोच श्रीधर तंबा,नितीन साळवी,रविंद्र बाईत सामाजिक कार्यकर्ते साई कोंढरे,योगेश सारसर,ज्योती कोळी,सुनिता कुवर,वैशाली घाडगे,संगीता डीखळे,संगीता बामगुडे,साक्षी टोणपे आदीमान्यवर व खेळाडू उपस्थित होते.
COMMENTS