शिरुर तालुक्याचे सुपुत्र जनता दल सेक्युलरचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या कार्याची दखल घेत माजी पंतप्रधान तसेच जनता दलाचे राष...
शिरुर तालुक्याचे सुपुत्र जनता दल सेक्युलरचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या कार्याची दखल घेत माजी पंतप्रधान तसेच जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी नाथा शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड केली.निवडी चे पत्र दिले आहे.
शिरूर (प्रतिनिधी) - शिरुर तालुक्याचे सुपुत्र असलेले नाथाभाऊ शेवाळे यांची जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात ओळख आहे. जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर युवकांच्या अनेक प्रश्नांबाबत आवाज उठविला असून शेतकऱ्यांच्या पेन्शन संबंधी यात्रा काढलेली आहे. तसेच शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, आदिवासी, प्रकल्पग्रस्त आदी घटकांसाठी अनेक लढे उभारले आहेत. सध्या नाथाभाऊ शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर शेवाळे यांच्या निवडीबद्दल जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रधाण सचिव प्रताप होगाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव पी. डी. जोशी, अजमल खान. रेवण भोसले, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, संजीवकुमार सदानंद, किरण छिद्रवाल, सुहास बने, किरण शेठ, ज्योती बडेकर, भगवान साळवी यांसह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS