शिरूर (प्रतिनिधी ) - येथील शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा येथे स्वतंत्र पोलीस चौकी आहे. त्या ठिकाणचे प्रभारी असिस्टंट पोलीस इन्स्...
शिरूर (प्रतिनिधी ) - येथील शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा येथे स्वतंत्र पोलीस चौकी आहे. त्या ठिकाणचे प्रभारी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर माननीय साबळे साहेब यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीं वरती दंडात्मक कारवाई सुरू केली मात्र सदर कारवाई करताना स्वतःच नियम मोडून वीणा मास्क असल्याचे दिसत आहे. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कारवाई करत आहेत. पोलिसांना कोरोना घाबरतो कि काय अशी चर्चा संबंध परिसरामध्ये सुरु आहे.
सदर ASI साबळे यांच्यासह काही पोलीस कर्मचारी यांनी बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० सुमारास मांडवगण फराटा याठिकाणी वीना मास्क प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली .परंतु ही कारवाई करत असताना साबळे व त्यांच्या सोबत असलेले यांनी स्वतः तोंडावरती मास्क लावले नव्हते. याबाबत लोकांनी विचारणा केली असता संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी लोकांशी उद्धट भाषेमध्ये उत्तरे दिली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
सदरील घटनेमुळे पोलिसांनाच कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे त्यामधून दिसत आहे. फक्त पावत्यांचे टारगेट पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून पावती करून दंड गोळा करण्यातच दंग झाल्याचे दिसत आहे. दंडाच्या पावत्या करणे हे अत्यंत महत्त्वाचे वाटले म्हणून त्यांनी मास्क न लावता पावती फाडून दंड गोळा करण्याचं काम अतिशय अक्कल हुशारीने करत होते.
मांडवगण फराटा येथील एका दुकानदारास फक्त 11 मिनटं दुकान लावण्यास वेळ लागला म्हणून एका सामान्य दुकांदाराकडून 1000/-रु. दंड वसुल केला.आधीच कोरोनामुळे दुकानदारांचे जगणं मुश्किल झालं आहे त्यात हे अशा दंड वसवली ने दुकानदारांचे कंबरडे मोडले जात आहे. या घटनेची स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चर्चा होत आहे.कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांना वेगळा कायदा आहे का ? की फक्त जनतेची लूट करण्यासाठी आणि त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी पोलीस प्रशासन असे तर करत नाही ना ! असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे ASI साबळे यांच्यावर कारवाई करणार का? या कडे सर्व मांडवगण गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS