गोलेगाव येथील लसीकरण मर्जीतील लोकांना जवळच्या व नातेवाईकांचे केले लसीकरण! गावातील लोकांना पूर्वकल्पना न देता केले लसीकरण! गोलेगाव चे सरपंच...
गोलेगाव येथील लसीकरण मर्जीतील लोकांना जवळच्या व नातेवाईकांचे केले लसीकरण!
गावातील लोकांना पूर्वकल्पना न देता केले लसीकरण!
गोलेगाव चे सरपंच व आरोग्य सेविका यांच्यावर आरोप
शिरूर (प्रतिनिधी )- गोलेगाव येथे बुधवार दिनांक. 4 ऑगस्ट 2021 रोजी प्राथमिक शाळा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाची ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतीच माहिती गावातील नागरिकांना दिली नाही. व मर्जीतील लोकांना लस दिल्याचा आरोप गोलेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप लोखंडे यांनी केला.
शिरूर तालुक्यातील गोलेगाव ग्रामपंचायत येथे 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात आले.या लसीकरणाची माहिती गावातील कोणत्याच नागरिकांना ग्रामपंचायतीने माहितीच दिली नसल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता लसीकरण मोहिमेची माहिती गावातील लोकांना दवंडी द्वारे, सूचना फलकावर सूचना लिहून देने अपेक्षित होते. मात्र लसीकरण हे आपल्याच मर्जीतील लोकांना देण्याच्या उद्देशाने सरपंच दिलीप पडवळ यांनी कोणत्याही प्रकारची सूचना अथवा दवंडी दिली नाही
गावातील लोकांना अंधारात ठेवत लसीकरण केले.
सरपंच दिलीप पडवळ यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे . लसीकरणाची पूर्वकल्पना ग्रामपंचायतिने देणे गरजेचे होते. परंतु गोलेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप पडवळ व आरोग्य केंद्र गोलेगाव येथील आरोग्य सेविका प्रमिला भोसले यांनी संगनमताने गावातील लोकांना पूर्वकल्पना न देता त्यांच्या जवळच्या मर्जीतल्या व त्यांच्या नातलगांचे लसीकरण केले असा आरोप गोलेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप लोखंडे यांनी केला.
लसीकरण मोहीम या दिवशी गावातील लोकांना नोंदणी करण्यास सांगितले होते. गावातील लोकांनी गोलेगाव आरोग्य केंद्र येथे जाऊन नाव नोंदणी केली. मात्र त्यांना लस मिळाली नाही. सदरील लोकांना आरोग्य केंद्र येथे नाव नोंदीत व्यस्त करून आपल्या मर्जीतील लोकांना प्राथमिक शाळेत बोलावून पिक्चर लसीकरण केल्याचा आरोप करण्यात आला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी दिलीप लोखंडे यांनी केले आहे.
तसेच या प्रकाराची विचारणा केली असता सरपंच दिलीप पडवळ यांनी माझ्याशी गैरवर्तन व असभ्य भाषा वापरली. या झालेल्या प्रकरणाची लेखी तक्रार दिलीप लोखंडे यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की लसीकरणाबाबत कोणीही काळजी करू नये सर्वांना टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल. तसेच गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
COMMENTS