पुणे ( प्रतिनिधी ) -पुणे जिल्हा (ग्रामीण) भाजप उद्योग आघाडी कार्यकारणी भाजपा कार्यालय पुणे येथे जाहीर करण्यात आली. या वेळ...
पुणे ( प्रतिनिधी )-पुणे जिल्हा (ग्रामीण) भाजप उद्योग आघाडी कार्यकारणी भाजपा कार्यालय पुणे येथे जाहीर करण्यात आली.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव, भाजप किसान मोर्चाचे पच्छीम महाराष्ट्र गणेश आखाडे, भाजपा कामगार आघाडी पूणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, अल्पसंख्याक भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष राजु शेख, भाजप सहकार आघाडी पूणे जिल्हाध्यक्ष भगवान पासलकर, मुळशी भाजपा तालुका अध्यक्ष जिवन कोंडे, उद्योग आघाडी शिरुर तालुका अध्यक्ष विजय भोस, सरपंच आघाडी शिरुर तालुका अध्यक्ष रविंद्र दोरगे, शिरुर तालुका भाजपा महिला अध्यक्ष वैजयंतीताई चव्हाण, शिरुर तालुका भाजपा सरचिटणीस गोरक्ष काळे, शिरुर शहर सरचिटणीस भाजपा रेश्मा शेख, विद्यार्थी आघाडी पूणे जिल्हा उपाध्यक्ष रोहन पाचंगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जिल्हा उद्योग आघाडी चे कामाचे कौतुक केले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग क्षेत्राला २० लाख कोटींचे दिलेले पॅकेज मुळे उद्योग श्रेत्राला त्याचा फायदा झाल्याचे सांगितले.
पुणे जिल्हात ५० हजार औद्योगिक कंपन्या असुन त्याचा लाभ ग्रामीण भागातील तरुणांना मिळवून देण्यासाठी तसेच कंपन्यांना त्रास होईल तेथे कंपन्यांना सहकार्य करण्याचे अभियान राबविण्यात येणार असल्याचे उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले.
यावेळी गणेश आखाडे, दादासाहेब सातव, गोरक्ष काळे, यांनी मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा ग्रामीण कार्यकारणी पुढील प्रमाणे जिल्हा अध्यक्ष संजय पाचंगे,सहसंयोजक धीरज भळगट, उपाध्क्ष वर्षां काळे, उपाध्यक्ष अजय जाधव, उपाध्यक्ष कुलदीप माने, सरचिटणीस काशिनाथ आवटे, विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ सरचिटणीस सुवर्णा खेडकर,विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ सचिव विकास भोर, विभाग प्रमुख राज्य औद्योगिक विकास महामंडळ सचिव बाळासाहेब बालगुडे,विभाग प्रमुख आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अमित रोकडे, विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य क्रुषी व पणन मंडळ कोषाध्यक्ष अभिजित पवार,विभाग प्रमुख महीला आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष संजीवनी रोकडे,प्रसिद्धी प्रमुख सुनिल गदादे,विभाग प्रमुख युवा उद्योजक सचिव महेंद्र ढवळे,विभाग प्रमुख - महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सचिव भरत सोळंकी,विभाग प्रमुख राज्य पर्यटन विकास महामंडळ सचिव सुरेश पिंगळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी कामगार आघाडी पूणे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे यांनी प्रस्तावित केले, तर शिरूर तालुका भाजपा सरचिटणीस गोरक्ष काळे यांनी आभार मानले.
COMMENTS