शिरुर ( प्रतिनिधी ) - कोंबडखाद्याचे बाकी असलेले २० हजार रुपये दिले नाही म्हणुन रात्रीच्या वेळेस १० ते १५ जणांना सोबत आणुन काठ्या व तलवारी...
शिरुर ( प्रतिनिधी ) - कोंबडखाद्याचे बाकी असलेले २० हजार रुपये दिले नाही म्हणुन रात्रीच्या वेळेस १० ते १५ जणांना सोबत आणुन काठ्या व तलवारीचा धाक दाखवत शेतकरी व त्याच्या पत्नीस घरात डांबून ठेवत पोल्ट्रीवर काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करत पोल्ट्रीतील अंदाजे १ लाख ३५ हजार रुपयांचे कोंबडखाद्य पिकअप मध्ये भरुन नेल्याचा गंभीर प्रकार शिरुर तालुक्यातील निमोणे येथे घडला असून याबाबत सुरेश साळुंखे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन याबाबत अजय जवळकर (रा.म्हातोबाची आळंदी) याच्यासह १०ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश साळुंखे हे आपल्या पत्नीसह निमोणे गावात दुर्गेवस्ती येथील कॅनॉलच्या शेजारीच राहतात.एक महिन्यापुर्वी त्यांनी अजय जवळकर याच्याकडुन कोंबड्यांसाठी खाद्य आणलं होतं. परंतु त्याचे पैसे देणं बाकी होत. बुधवार (दि ८) रोजी दुपारी ४:३० वाजता दोन व्यक्तीसह पैसे मागण्यासाठी आला. त्यावेळी सुरेश साळुंखे यांनी आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत नंतर देतो असे सांगितले. यावेळी अजय जवळकर याने तुम्ही पैसे कसे देत नाहीत तेच बघतो असे म्हणत दमदाटी केली आणि निघून गेला.
त्यानंतर रात्री ११:३० च्या सुमारास जवळकर हा त्याच्या १० ते १५ साथीदारांसह पुन्हा साळुंखे यांच्या घरी आला. त्यानंतर त्याने त्याच्या २ ते ३ साथीदारांसह पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या गंगाराम अकोलकर यास मारहाण केली. यावेळेस त्या सर्वांच्या हातात काठ्या व तलवार होती. त्यांचा आरडाओरडा ऐकुन साळुंखे यांची पत्नी बाहेर आली. यावेळेस जवळकर याने त्यांना ढकलून देत त्यांच्या गळ्यातील ४ तोळ्याचे गंठन हिसकावून घेतले. त्यावेळी साळुंखे यांच्या पत्नी घाबरुन घरात गेल्या त्यानंतर जवळकर याने बाहेरुन कडी लावत दोन्ही पती-पत्नीला कोंडुन घेतलं. त्यानंतर त्याने पोल्ट्रीत असलेल्या १० ते १५ कोंबड्यासहीत अंदाजे १ लाख ३५ हजारांचे कोंबड्याचे खाद्य पिकउप मध्ये चोरुन नेले.
याबाबत शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव
करत आहेत.
साळुंखे कुटुंब दहशतीच्या छायेत
सुरेश साळुंखे यांचे घर निमोणे गावापासून २ किमी अंतरावर एकांतात आहे. तिथे साळुंखे व त्यांची पत्नी राहतात. शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय करतात. पोट्रीत काम करण्यास एक कामगार आहे. परंतु घडलेल्या प्रकारामुळे हे कुटुंब पुर्ण दहशतीखाली असुन पोलिसांनी आरोपींवर दाखल केलेले गुन्हे सौम्य स्वरुपाचे असल्याचा आरोप साळुंखे यांनी केली असुन आरोपींवर दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कायद्याच्या तरतुदीनुसार आम्ही आरोपींवर गुन्हे दाखल केले असुन त्याबाबत वरीष्ठांना माहीती दिली आहे.
COMMENTS