शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर शहराजवळ रामलिंग रस्त्यावरील ओम रूद्रा कॉलनी येथे बंद दरवाजाचे कुलूप तोडून आतील सोने चांदी रोख रक्कम असा १ लाख २...
सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये चार चोरटे कैद झाले असून, हिंदी बोलत असल्याचे समजते.
याप्रकरणी दिलीप मोतीराम क्षिरसागर रा. ओम रूद्रा कॉलनी शिरूर यांनी फिर्याद दिली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी है दिनांक २२जून रोजी आई आजारी असल्याने पातूर, जि. अकोला येथे गावाकडे गेलो होतो. दिनांक ३०जून रोजी त्यांच्या शेजारी राहणारे प्रितम जाधव यांचा फिर्यादीस फोन आला की त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आहे. व त्याठिकाणी चोरी झाली असून, पोलीस आले आहेत. त्यानतंर मी एक जून रोजी माझे ओम रुद्रा कॉलनी येथे आलो असता माझ्या घरात पाहाणी केली असता घरातील कपाट उघडलेले व सामानअस्तव्यस्त पडलेले होते.घरातील सामानाची तपासणी केली असता त्यात तीन तोळे सोन्याचे मोहनमाळ किंमत एक लाख वीस हजार रुपये, चांदीची नाणी, रोख पाच हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजार रुपयाचा ऐवज चोरटयांनी चोरुन नेला आहे. तर फिर्यादीच्या शेजारी राहणारे दिपक जिजाबा पाटील घर क्रमांक ७४ यांच्या घरीही चोरी झाली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून,चोरी व घरफोडी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एच एस पडळकर करीत आहे.
COMMENTS