शिरूर ( प्रतिनिधी ) - राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने येथील मूकब...
शिरूर ( प्रतिनिधी ) - राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने येथील मूकबधिर शाळेतील मुलांना खाऊन चे व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या परिसरामध्ये वृक्ष रोपण करण्यात आले.
राज्यात सर्वत्र कोरोना ने थैमान घातल्यामुळे व कोल्हापूर सातारा सांगली येथे पुरामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने शहरांमध्ये वृक्षरोपण, अनाथ मुलांना खाऊचे वाटप तसेच शिरूर शहरात शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये शिवसेनेच्या नाम फलक लावण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शहर प्रमुख मयूर थोरात, नगरसेविका अंजली ताई थोरात, उपशहर प्रमुख पप्पू गव्हाणे, उपशहर प्रमुख संदीप जामदार, उपशहर प्रमुख सुरेश गाडेकर, उपशाखाप्रमुख अमोल गोरे, महिला जिल्हा संघटिका शैलाताई दुर्गे, शाखाप्रमुख नितीन जामदार, लाला लोखंडे, नितीन केदारे, यश दरेकर, अमोल हरगुडे, मनोज भगत, सुनील परदेशी, मेजर राजेश गोपाल आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
COMMENTS