मुरबाड (प्रतिनिधी) - १ जुलै २०२१ रोजी राज्याचे माजी महसुलमंत्री स्व.शांतारामभाऊ घोलप यांच्या जयंतीनिम्मित्ताने ब्लॅाक काँग्रेस कमिटी, यु...
मुरबाड (प्रतिनिधी) - १ जुलै २०२१ रोजी राज्याचे माजी महसुलमंत्री स्व.शांतारामभाऊ घोलप यांच्या जयंतीनिम्मित्ताने ब्लॅाक काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व आद.राहुलजी गांधी विचारमंच मुरबाड तालुका कार्यकारिणी नियुक्ती समारंभ काँग्रेसभवन येथे जेष्ठ नेत्या सुमनताई घोलप, माजी तालुकाध्यक्ष तुकाराम ठाकरे, जयराम पडवल, परशुराम भोईर, ट्रस्टचे सचिव ॲड.अशोक फनाडे, दशरथ टोहके, पुंडलिक चहाड, माजी सभापती माधुरी घुडे, सेवादलचे
जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेलार, सखाराम भावार्थे, भरत विशे आदींच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. ॲड.अशोक फनाडे यांनी प्रास्ताविक करताना स्व. शांतारामभाऊ घोलप यांच्या कार्याची उजळणी केली तर नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांस पोटास लावणे ह्या उक्ती नुसार घोलप साहेबांनी तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी पाझर तलाव बांधले, शिक्षण संस्था, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, MIDC आदीं लोकउपयोगी कामे करुन तालुक्यांतील नागरिकांच्या रोजी-रोटी सोबत जीवनमान उंचावण्याचे काम केल्याचे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले.तालुका ब्लॅाक काँग्रेस कमिटीमध्ये पांडुरंग शिंगोळे - वरिष्ठ उपाध्यक्ष, गुरूनाथ पष्टे- मुख्यसमन्वयक, गणेश देशमुख- उपाध्यक्ष, नेताजी लाटे- उपाध्यक्ष, मारूती टोहके-सरचिटणीस, सुनिल साबळे- सरचिटणीस, विनोद आघाणे- तालुकाध्यक्ष सोशल मिडिया, गुरुनाथ देशमुख-संघटक, बिप्पिन भावार्थे-सचिव, संजय विशे-सचिव, हरिचंद्र पष्टे व मुश्ताक शेख तालुका कार्यकारणी सदस्य, एकनाथ कंटे-डोंगरन्हावे गण प्रमुख, संजय कराळे-शिवळे गणप्रमुख, दिनेश जाधव- नारिवली गणप्रमुख, जयवंत हरड- असोले गणप्रमुख, प्रकाश लिहे- गणप्रमुख देवगाव, जयराम उघडा-माळ गणप्रमुख. अनंता तिवार- वैशाखरे गणप्रमुख, दिपक आलम-किसळ गणप्रमुख तर तालुका युवक काँग्रेस कमिटी मध्ये साईनाथ कंटे- उपाध्यक्ष, संजय चौधरी- उपाध्यक्ष, तानाजी पष्टे-सोशल मिडिया अध्यक्ष, अमोल चोरघे- संघटक, निलेश केदार- सरचिटणीस, निलेश अगिवले- सचिव, सुनिल भोईर- सचिव, सचिन धुमाळ - सचिव तसेच विचारमंच मध्ये अमोल चौधरी- सरचिटणीस, उत्तम बांगारा- संघटक, योगेश कडव- संघटक, योगेश दळवी-सचिव आदींची अशी जम्बो कार्यकारिणी तयार केली असुन पुढे अजुन दोन टप्प्यामध्ये नेमणुका होणार आहेत. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष संध्या कदम, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, शहरअध्यक्षा शुभांगी भराडे, सिराज अत्तार, अर्जुन पष्टे आदींनी मेहनत घेतली. जेष्ठ नेते तुकाराम ठाकरे व जयराम पडवल यांनी घोलप साहेबांच्या प्रेरणादायक काळातील गोष्टी उपस्थितांना सांगितल्या तसेच नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS