पोलीस ठाण्यातील मुख्य वसुली बहाद्दरांना अभय का? शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर पोलीस ठाण्यातील कार्यरत असणारे एका पोलीस कर्मचाऱ्याचे निल...
पोलीस ठाण्यातील मुख्य वसुली बहाद्दरांना अभय का?
शिरूर (प्रतिनिधी )- शिरूर पोलीस ठाण्यातील कार्यरत असणारे एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन तर दोन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली. या कारवाईने शिरूर पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली . मात्र पोलीस ठाण्यातील आणखीन तीन वसुली बहाद्दरांना अभय का असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती समजली आशिकी शिरूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या कडून वारंवार पैशाची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली होती.तशी तक्रार एका वाळू व्यवसायिकांने पोलिस अधीक्षकांकडे केली असल्याचे समजते.
सदरील कर्मचारी हे रात्रीच्या वेळेस काम करत असत वाळूने भरून येणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवून त्यांच्या कडुन पैशाची मागणी करत असत. या सततच्या मागणीला त्रासून वाळू व्यावसायिकाने पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचे पुरावे सुद्धा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदरील कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यांच्या प्राथमिक चौकशीत ते दोषी आढळून आल्याचे नीदर्शनास येताच एका पोलीस कर्मचाऱ्याची निलंबन तर दोघांची मुख्यालयात बदली करण्यात आली.
पोलिस अधीक्षकांनी केलेल्या सदरील कारवाईचे शिरूर येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अभय का दिले जाते अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. संबंधित कर्मचारी हे शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासाठी वसुली करत असल्याची चर्चा शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे.
शिरूर शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली केली जात असल्याची चर्चा आहे. शिरूर शहरात अवैद्य मटका, अवैद्य दारू, अनधिकृत क्लब तसेच मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विकला जातो या अवैध व्यवसायीका कडून मोठ्या प्रमाणात मलिदा गोळा केला जातो. या वसुलीसाठी तीन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे समजते. कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यांची नावे का डिकलेर करत नाही तुम्ही सर
ReplyDelete