Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई! अट्टल मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद

  शिरूर ( प्रतिनिधी ) - पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शा...


 शिरूर ( प्रतिनिधी ) - पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. पथकाने तीन आरोपींनां ताब्यात घेतले असुन त्यांच्या कडून तब्बल ८,७०,००० रुपये किमतीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या दमदार कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

           या बाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले कि,पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या असंख्य  घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांनी सदर मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्यानुसार नारायणगाव पोस्टे गु.र.नं १०७/२०२१ भादवि कलम ३७९ चा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा, ओतूर तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्यातील फरार आरोपी किरण पिंपळे याचा शोध घेत असताना शुक्रवार दिनांक  ९ जुलै २०२१ रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की किरण पिंपळे हा त्याचा साथीदार प्रवीण बाचकर याच्या सोबत चोरीच्या मोटारसायकली घेण्यासाठी आदित्य निकम नावाच्या इसमाकडे रांजनी,ता.आंबेगाव, जि. पुणे गावचे हद्दीत कारफाटा येथे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लगेचच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने मिळालेल्या बातमी प्रमाणे रांजनी कारफाटा या ठिकाणी सापळा लावला असता एक इसम विना नंबर च्या मोटरसायकली सह संशयितरित्या फिरताना आढळून आला. थोड्याच वेळात २ इसम मोटरसायकलींवर त्या ठिकाणी आले त्यांना थांबवून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे किरण भास्कर पिंपळे वय २५,रा. दरडगाव ता. राहुरी,जि. अहमदनगर,प्रवीण नामदेव बाचकर वय २८ रा. कानगर ता. राहुरी जि. अहमदनगर,आदित्य दत्तू निकम वय १९ रा. खोडद,ता. जुन्नर, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्यातील आदित्य निकम याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचा साथीदार रोहित गुंजाळ व अर्जुन पवार यांच्यासह मिळून पुणे,अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकानांवरून मोटारसायकली चोरी केल्या असून चोरलेल्या गाड्या आम्ही किरण पिंपळे, प्रवीण बाचकर कैलास येळे यांच्याकडे विक्रिस देत असल्याचे सांगितले.

             चोरलेल्या मोटारसायकली पैकी काही मोटारसायकली आदित्य निकम याच्या घराजवळ लावल्या असून काही मोटारसायकली किरण पिंपळे, प्रवीण बाचकर,कैलास येळे यांच्याकडे आहेत अशी माहिती दिली.सदर माहिती वरून वरील ठिकानी जाऊन एकूण ८,७०,००० रुपये किमतीच्या  विविध कंपनीच्या एकूण २० मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सदर आरोपिंची सखोल माहिती घेतली असता त्यांच्यावर विविध  पोलीस स्टेशन मध्ये सदर मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 


 १) खेड पोस्टे गु.र.नं ३३२/२०२१ भादवि कलम ३७९

२) खेड पोस्टे गु.र.नं

३६२/२०२ भादवि कलम ३७९

३) पारनेर पोस्टे गु.र.नं

१६७/२०२१ भादवि कलम ३७९

४) शिरूर पोस्टे गु.र.नं

४७२/२०२० भादवि कलम ३७९

५) शिरूर पोस्टे गु.र.नं

१४५/२०२१ भादवि कलम ३७९

६) ओतूर पोस्टे गु.र.नं ६५/२०२१ भादवि कलम ३७९

७) यवत पोस्टे गु.र.नं ८६८/२०२० भादवि कलम ३७९

८) आळेफाटा पोस्टे गु.र.नं २२३/२०२१ भादवि कलम ३७९

९) शिरूर पोस्टे गु.र.नं ५२९/२०२१ भादवि कलम ३७९

१०) शिरूर पोस्टे गु.र.नं ४०८/२०२१ भादवि कलम ३७९

                 तसेच आरोपी किरण भास्कर पिंपळे वय २५,रा. दरडगाव ता. राहुरी,जि. अहमदनगर हा 

नारायणगाव पो.स्टे गु र नं १०७/२०२१ भा द वी कलम  ३७९,नारायणगाव पो. स्टे गु र नं १२१/२०२१ भा द वी कलम ३७९ या गुन्ह्यात नारायणगाव पोलीस स्टेशन च्या  गुन्ह्यात फरार होता.

            सदर आरोपींकडून ८,७०,०००/- रकमेच्या एकूण २० मोटारसायकल जप्त केल्या असून आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी नारायणगाव पोस्टे च्या ताब्यात दिले आहे.

          सदर ची कारवाई ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग श्री मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस नि.श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि  नेताजी गंधारे,सपोनि पृथ्वीराज ताटे,पोहवा हनुमंत पासलकर, पोहवा विक्रम तापकीर,पोहवा दिपक साबळे,पोहवा सचिन गायकवाड,पोना संदीप वारे,पोशी अक्षय नवले

पो.शी निलेश सुपेकर,चालक पोहवा मुकुंद कदम

चापोशी दगडू वीरकर तसेच नारायणगाव पोस्टे चे

पोना दिनेश साबळे,पोशी सचिन कोबल यांनी केली आहे.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई! अट्टल मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई! अट्टल मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद
https://1.bp.blogspot.com/-L4cmk7i8srs/YOk8R4zlykI/AAAAAAAAFbo/7ZWnaL-WPe4ujheZsymBavlBpao3gzbwwCLcBGAsYHQ/s320/IMG-20210709-WA0450.jpg
https://1.bp.blogspot.com/-L4cmk7i8srs/YOk8R4zlykI/AAAAAAAAFbo/7ZWnaL-WPe4ujheZsymBavlBpao3gzbwwCLcBGAsYHQ/s72-c/IMG-20210709-WA0450.jpg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/07/Pune%20Gramin.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/07/Pune%20Gramin.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content