Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

शिरूर येथील ॲक्सिस बँकचे एटीएम चोरीतील तीन आरोपींना केले जेरबंद, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

  आरोपींकडून ४ चोरीच्या मोटरसायकली जप्त : एकूण ५ चोरीचे गुन्हे उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी     शिरूर ( प्रतिनिधी ) - पुणे ग...

 


आरोपींकडून ४ चोरीच्या मोटरसायकली जप्त : एकूण ५ चोरीचे गुन्हे उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी


    शिरूर ( प्रतिनिधी ) - पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर येथील ॲक्सिस बँकचे एटीएम चोरीतील  तीन आरोपींना  जेरबंद केले. आरोपीकडून चार चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असल्याचे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.

         याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की  ७ दिवसापूर्वी शिरूर, सरदवाडी येथील ॲक्सिस बँकेचे एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा काही अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला होता. याबाबत शिरपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास पुणे शाखेने करत अवघ्या सात दिवसात गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली.

       शिरूर पोलीस ठाणे हद्दीत दि.२०/०७/२०२१ रोजी रात्री १२:३० वा.चे सुमारास पुणे नगर रोड,  सरदवाडी ता.शिरूर जि.पुणे येथे असलेले ॲक्सिस बँकचे एटीएम कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गॅस कटरचे सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला व एटीएमच्या रूममध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तसेच एटीएमच्या मशीनचे नुकसान केलेबाबत धनंजय दशरथ गायकवाड वय २८ वर्ष रा.कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पो.स्टे. गु.र.नं. ५४०/२०२१ भादंवि क. ३८०, ५११, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

          सदर घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासणी करून आरोपींची माहिती काढली असता ते नेवासा फाटा या भागातील असल्याची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्हयात जाऊन त्यांच्यावर पाळत ठेवून १) आकाश उर्फ निलेश अनिल गायकवाड वय २७ वर्षे रा.नेवासा, ज्ञानेश्वर मंदिर रोड, ता.नेवासा जि.अहमदनगर.२) तन्मय उर्फ सोनल संदिप साळवे वय २१ वर्षे रा.नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर.३) अशिष माणिक डुकरे वय २१ वर्षे रा.नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपीवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक  गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

     आरोपींची अधिक चौकशी केली असता  त्यांनी  वाळूंज एमायडीसी येथून पहाटेच्या सुमारास चोरलेल्या दोन मोटरसायकली बेलापूर ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर येथे विक्री करणेसाठी आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेकडे अधिक विचारपूस करता त्यांनी ७ दिवसापूर्वी शिरूर, सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी औरंगाबाद वाळूंज एमआयडीसी येथून १ बजाज पल्सर, १ होंडा शाइन व अहमदनगर एमआयडीसी येथून १ होंडा शाइन व तोफखाना येथून १ होंडा पॅशन प्रो अशा एकूण ४ मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले आहे. त्याबाबत खालील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

१) वाळूंज एमआयडीसी पो.स्टे. (औरंगाबाद) गु.र.नं.७८३/२०२१भादंवि क.३७९

२) वाळूंज एमआयडीसी पो.स्टे. (औरंगाबाद) गु.र.नं.७८४/२०२१ भादंवि क.३७९

३) अहमदनगर एमआयडीसी पो.स्टे. (अहमदनगर) गु.र.नं. ४३७/२०२१ भादंवि क.३७९

४) तोफखाना पो.स्टे. (अहमदनगर) गु.र.नं. /२०२१ भादंवि क.३७९

     सदर चोरीच्या ४ मोटरसायकली किं.रू.२, ५५,०००/- (दोन लाख पंचावन्न हजार) च्या तिघे आरोपींकडून जप्त करून  मोटरसायकल चोरीचे ४ व एटीएम चोरीचा १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. 

     सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना शिरूर पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

              सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो., दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,सपोनि. सचिन काळे,पोहवा. महेश गायकवाड, 

पोहवा. निलेश कदम, पोहवा. जनार्दन शेळके,पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. राजू मोमीन,पोहवा. सुभाष राऊत,पोहवा. गुरु गायकवाड,पोना. अजित भुजबळ,

पो.ना. अभिजित एकाशिंगे,पोहवा. काशिनाथ राजापुरे

यांनी केलेली आहे.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: शिरूर येथील ॲक्सिस बँकचे एटीएम चोरीतील तीन आरोपींना केले जेरबंद, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
शिरूर येथील ॲक्सिस बँकचे एटीएम चोरीतील तीन आरोपींना केले जेरबंद, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
https://1.bp.blogspot.com/-65rXl2nUzSE/YQDgmeI1aYI/AAAAAAAAFlw/nZJf2ztRNAoXEP2OrvOjOp9CKDLR9_yFACLcBGAsYHQ/s320/SAVE_20210728_094408.jpg
https://1.bp.blogspot.com/-65rXl2nUzSE/YQDgmeI1aYI/AAAAAAAAFlw/nZJf2ztRNAoXEP2OrvOjOp9CKDLR9_yFACLcBGAsYHQ/s72-c/SAVE_20210728_094408.jpg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/07/Pune%20Gramin%20Sthanik%20Gunhe%20Shakha%20.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/07/Pune%20Gramin%20Sthanik%20Gunhe%20Shakha%20.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content