Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

ओबीसी आरक्षणा संदर्भातला ठराव राज्य सरकारकडून मंजूर, सरकारने ओबीसींची दिशाभूल केली ठराव हा पूर्णतः चुकीचा देवेंद्र फडणवीसांचा दावा

  ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळावा, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावार विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षा...

 


ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळावा, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावार विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली.मात्र चर्चेदरम्यान जोरदार आरोप प्रत्यारोप करत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाला.

मुंबई ( प्रतिनिधी ) - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खाडाजंगी झाली.ओबोसी आरक्षण आणि एम पी एसी च्या रिक्त जागा भरती वरून जोरदार खडाजंगी होऊन कामकाज थांविण्यात आले.ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळावा, या मागणीचा  प्रस्ताव छगन भुजबळ यांनी मांडला व तो प्रस्ताव आवाजी मतदान घेऊन मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची चर्चा पार पडली. मात्र चर्चेदरम्यान जोरदार आरोप प्रत्यारोपांची  खडाजंगी यावेळी पाहायला मिळाळी . हा प्रस्तावच मुळात राजकीय आहे, या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  ओबीसींच्या आरक्षणासंबंधी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या, ओबीसींचे आशीर्वाद घ्या, असं आवाहन फडणवीसांच्या आरोपाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी दिलं. मात्र चर्चा पार पडत असताना जोरदार गदारोळ पाहयला मिळाला. विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये आले. काही आक्षेप नोंदवत त्यांनी अध्यक्षांच्या समोरचा माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच हा प्रस्ताव आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.


सरकारने ओबीसींची दिशाभूल केली, ठराव हा पूर्णतः चुकीचा - देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते

पॉलिटिकल इंम्पिरिकल डाटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकतं, असं म्हणत राज्य सरकारने आणलेला ठराव हा पूर्णतः चुकीचे असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. सरकारने ओबीसींची दिशाभूल केली. या ठरावाने ओबींसींना आरक्षण मिळणार नाही. आम्ही सरकारचा विधानसभेत बुरखा फाडला, आणखी बुरखा फाटू नये म्हणून विधानसभेत सत्ताधारी पक्षाने वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फडणवीस यांनी केला.

रोहिणी आयोग म्हणजे ओबीसी समाजाचे तुकडे करणारा आयोग - छगन भुजबळ 

ओबीसी आरक्षणासंदर्भातला ठराव भुजबळांकडून सादर

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. भुजबळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली. तसेच या डेटाला आमचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला. यावेळी विरोधकांनी  अध्यक्षा समोर येऊन गदारोळ केला. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी ठराव मंजूर केला. त्यानंतर दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: ओबीसी आरक्षणा संदर्भातला ठराव राज्य सरकारकडून मंजूर, सरकारने ओबीसींची दिशाभूल केली ठराव हा पूर्णतः चुकीचा देवेंद्र फडणवीसांचा दावा
ओबीसी आरक्षणा संदर्भातला ठराव राज्य सरकारकडून मंजूर, सरकारने ओबीसींची दिशाभूल केली ठराव हा पूर्णतः चुकीचा देवेंद्र फडणवीसांचा दावा
https://1.bp.blogspot.com/-2G1qJTTFr2A/YOLYZsgIbMI/AAAAAAAAFZY/8lcndXrb9N8UnDAE4vX3VZs0AhhLkav8wCLcBGAsYHQ/s0/download%2B%252812%2529.jpeg
https://1.bp.blogspot.com/-2G1qJTTFr2A/YOLYZsgIbMI/AAAAAAAAFZY/8lcndXrb9N8UnDAE4vX3VZs0AhhLkav8wCLcBGAsYHQ/s72-c/download%2B%252812%2529.jpeg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/07/Pawsali%20Adhiveshan%20OBC%20Arkshan%20.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/07/Pawsali%20Adhiveshan%20OBC%20Arkshan%20.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content