निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांम...
निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याच्या सूचना करण्याबाबतचे निवेदन अहमदनगर जिल्हा मातंग समाज पंच कमिटी व समस्त मातंग समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी पंचकमिटीचे अध्यक्ष साहेबराव पाचारणे, युवा अध्यक्ष उमेश साठे, कार्याध्यक्ष मधुकर पठारे, भगवानराव गोरखे, पोपटराव साठे, दिनकर सकट, डी.जी. साठे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचे कळविले आहे. तरीसुद्धा काही कार्यालयांमध्ये याची अंमलबजावणी होत नसून, अनेक कार्यालय सदर जयंती साजरी करण्यास उदासीनता दिसून येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी व्हावी, याची अंमलबजावणी न करणार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
COMMENTS