मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - मुरबाड तालुक्यातील टोकावडे सरळगाव,धसई, म्हसा, शिवले, व मुरबाड परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने चां...
मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - मुरबाड तालुक्यातील टोकावडे सरळगाव,धसई, म्हसा, शिवले, व मुरबाड परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने चांगलीच बॅटींग सुरु केली होती त्यावेळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी विविध जातीच्या बियाण्याची पेरणी केली त्यानंतर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या परंतु आता तालुक्यात दहा दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतातील व माळरानावरील भात रोपे करपत चालली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. तसेच ऐन पावसाळ्यात कडक उन्हाळा जाणवत असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ झाल्याने नागरिकांना उष्ण घामाची सामना करावा लागत आहे.
तालुक्यात जवळपास 16 हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाते त्यासाठी शेतकऱ्यांनी विविध जातीच्या बियाण्याची पेरणी केली होती परंतु पावसाने दडी मारल्याने दडी मारल्याने शेतातील व राणमाळावरील पेरलेले भाताची रोपे करपली व भाताची रोपांची उंची कुठली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे तसेच शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.
मुरबाड तालुक्यात जुन महिन्यात पेरणी केली जाते त्यानंतर १५ते२० दिवसात हळू-हळू भाताची उंची वाढली जाते. त्यामुळे मुरबाड ग्रामीण भागात एक ऐतिहासिक बाब म्हणजे भात लावण्यापूर्वी तालुक्यातील काही गावांमध्ये गावाच्या गाव देवाची पूजा करून सात केली जाते त्यानंतर प्रत्येक गावातील शेतकरी आपल्या शेतात भात लावायला सुरुवात करतो. परंतु पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये सात लांबल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुरबाडमध्ये दहा दिवस पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपत चालली आहेत त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. व येत्या दोन ते चार दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकरी वर्गासमोर मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे संकट उभे राहील असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.तसेच पावसाने दडी मारल्याने विहीर, नाले, नदी पात्रातील काही प्रमाणात पाणी आटल्याचे चित्र दिसून येत आहे.
दहा दिवस पाऊसाने दडी मारल्याने, पेरलेल्या भाताच्या रोपांची उंची कुठली व, भाताची रोपे करपत चालली.
लाॅकडाऊनचच्या काळातही शेती करणं आता महाग झाले , शेतीची मजुरी गेली ४०० ते ५०० रुपये वर
पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली.
भाताची रोपे करपत आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल,व दुबार पेरणीचे संकट समोर आल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त!
सूदाम शांताराम धुमाळ
शेतकरी कोरावले
COMMENTS